आलिया अन् संजय दत्तचा सडक 2 देखील OTT वर रिलीज होणार, मुकेश भट म्हणाले – ‘टिकून राहण्यासाठी दुसरा पर्याय नाही’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका मागोमाग एक मोठ्या बॅनरवरील सिनेमे आता ओटीटीवर रिलीज होत आहेत. गुलाबो सिताबोनंतर आता आलिया भट, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, पजूा भट स्टारर सडक 2 सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. प्रोड्युसर मुकेश भट यांनी ही माहिती कंफर्म केली आहे.

मुकेश यांचा सडक 2 हा सिनेमा 2 ते 10 जुलैदरम्यान थिएटरमध्ये रिलीज होणार होता. परंतु आता शेड्युल बदललं आहे. मुकेश भट म्हणाले, “कोरोनाच्या केसेस घटण्याऐवजी वाढत आहेत. अशा तुम्हाला वाटतं का सिनेमा हॉल सुरू होतील? आणि जरी थिएटर सुरू झाले तरी लोक सिनेमा पहायला येतील का? लोकांना आपलं घर वाचवायचं आहे. आज आयुष्य खूप जरूरी झालं आहे. 1991 साली आलेल्या सडक या सिनेमाचा सिक्वल सडक 2 आहे. या सिनेमात पूजा भट आणि संजय दत्त दिसले होते. मोठ्या स्क्रीनसाठी बनवलेला हा महत्त्वाचा प्रोजेक्ट होता. परंतु आता सर्वाइव करण्यासाठी निर्मात्यांना डिजिटल रिलीजसोबत जावं लागणार आहे.”

मुकेश भट म्हणाले, “मी डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी मजबूर आहे. कारण आता थिटयर्स सुरू होण्याची चिन्ह नाहीत. आता हाच एक ऑप्शन राहिला आहे. टिकून राहण्यासाठी हे बेस्ट आणि सर्वात सोपं आहे.”

मुकेश भट असंही म्हणाले, “ओटीटीवर सिनेमे रिलीज झाले म्हणजे याचा अर्थ असा नाही की, थिएटर्स बंद होतील. लोकांना आउटींग हवं आहे. मोठ्या स्क्रीनवरील मनोरंजन मजेदार असतं. ही टेंपररी फेज आहे. आपण समजून घ्यायला हवं. नाराज होणं किंवा एकमेकांना नीचा नाही दाखवला पाहिजे. उलट आपण एकमेकांना हिंमत द्यायला हवी.