Sadak 2 Trailer Dislike : आलिया भट्टच्या सिनेमाच्या ट्रेलरला सुमारे 1 कोटी लोकांनी केलं ना’पसंद’, बनलं रेकॉर्ड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि संजय दत्त फेम सडक 2 सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले पण सिनेमाच्या ट्रेलरला पसंती ऐवजी नापसंतीच जास्त मिळताना दिसत आहे. असं खूप वेळा पाहायला मिळतं की एखाद्या व्हिडिओला पसंती ऐवजी नापसंतीच अधिक मिळाली. घराणेशाहीच्या वादात अडकलेल्या सिनेमाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आणि जवळजवळ 9.6 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी याला नापसंती दिली आहे. लोक फक्त नापसंती देऊन गप्प बसत नाहीत तर त्यावर तऱ्हेतऱ्हेचे कॉमेंट्स देखील देत आहेत. अनेक लोक याला सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी सुद्धा जोडत आणि घराणेशाहीशी संबंध जोडत यावर बहिष्कार घालत आहेत.

सिनेमाची नापसंती वाढतच चालली आहे. असं म्हटलं जातं आहे की लवकरच हा आकडा एक कोटी पार करेल. जर असं होत राहिलं तर नापसंतीचा एक अनोखा रेकॉर्ड या ठिकाणी होऊ शकतो. सिनेमाचा ट्रेलर आत्तापर्यंत 4 कोटी 28 लाख वेळा पाहिला गेला पण पसंती फक्त 5 लाख लोकांचीच मिळाली आहे.

https://www.instagram.com/aliaabhatt/?utm_source=ig_embed

सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हा लोक घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित करत होते. या सिनेमात महेश भट्टची मुलगी आलिया भट्ट आणि पूजा भट्ट या दोघी दिसणार आहेत. लोकांच्या अशा प्रतिक्रियेमुळे हा सिनेमा चित्रपटगृहांऐवजी 28 ऑगस्ट ला हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनानंतरच कळेल की हा सिनेमा लोकांच्या कितपत पसंतीस उतरेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like