मोठी झाली पोरगी ! सलमान खानच्या प्रेमिकेच्या भूमिकेत करतेय बॉलिवूडमध्ये ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा इंडस्ट्रीचा एक सुप्रसिद्ध लाँच पॅड आहे. त्याने अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींना लॉन्च केले आहे. आता तो आपला मित्र महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरला ‘दबंग ३’ मधून लॉन्च करत आहे. पहिल्याच चित्रपटात ती सलमान खानची हिरोईन बनली आहे. चित्रपट दबंग-३ सई मांजरेकर सलमान खानच्या तारुण्यातील गर्लफ्रेंड म्हणून दिसणार आहे. नुकतीच सईने आपल्या सीनची शुटिंग पूर्ण केली आहे. चित्रपटामधील त्यांची केमिस्ट्री बघण्याआधीच त्यांचा इंटरनेटवर एक फोटो व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये सलमान एका छोट्या मुलीबरोबर दिसतो आहे आणि ती मुलगी सई आहे. कधी काळी सलमानसोबत फोटो काढणारी मुलगी आज त्याच्यासोबत हिरोईन म्हणून लॉन्च होणार आहे.

आता सोनाक्षी सिन्हा काय करणार आहे या विचारात तुम्ही पडू नका. सोनाक्षी तर रज्जो आहे. ती चुलबुल पांडेची पत्नी आहे. तिला कोणी कसे हटवू शकेल? पण यावेळी प्रथमच फ्लॅशबॅकमध्ये चुलबुल पांडेची प्रेमिका दाखविण्यात येणार असून ही भूमिका सई साकारणार आहे. हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. यासह आणखी एक महत्वाची माहिती समोर आली की हा चित्रपट एका नव्हे तर दोन नव्हे तर चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सलमान खानचा दबंग-३ हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड भाषेत रिलीज होणार. आता भाईची लोकप्रियता इतकी वाढली आहे की हा चित्रपट चार भाषांमध्ये रिलीज करावा लागला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like