‘तांडव’ पासून ते तैमूरच्या नावापर्यंत, अद्याप ‘या’ वादात सापडला आहे सैफ अली खान

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्टर सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अ‍ॅक्ट्रेस डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची तांडव (Tandav) या अ‍ॅमेझॉन प्राईमवरील वेब सीरिजमुळं नवा वाद सुरू झाला आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. सध्या ही सीरिज बॅन करण्याची मागणी सुरू आहे. सीरिजचे मेकर्स आणि कलाकारांविरोधात काही शहरात एफआयआर दाखल झाली आहे. वादानंतर मेकर्सनी माफीही मागितली आहे. तरीही यावरील वाद सुरूच आहे. तसंच या सीरिजवर आणि संबंधित कलाकारांवर एफआयआर दाखल होण्याची मालिका सुरूच आहे. अद्याप मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशा राज्यात सीरिजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. सध्या वादात सापडलेला सैफ अली खान याआधीही अनेक कॉन्ट्रोव्हर्सीत सापडला आहे. तांडवपासून तर त्याचा मुलगा तैमूर अली खानच्या नावा पर्यंत सैफच्या काही विवादांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

तांडवमुळं सैफ वादात
सध्या सैफ तांडव सीरिजमुळं वादात आहे. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी तांडव सीरिजला विरोध करत रामभक्त आणि शिवभक्तांना अ‍ॅक्टर सैफ अली खानच्या घराबाहेर एकत्र जमण्याचं आवाहन केलं होतं. कदम यांनी यासंदर्भात काही ट्विट्स केले होते.

आपल्या ट्विटमध्ये राम कदम यांनी लिहिलं होतं की, सर्व देशवासी तसंच रामभक्त आणि शिवभक्त चलो चलो सैफ अली खानच्या घरी. सैफ अली खानजी तांडव वेब सीरिजची स्क्रिप्ट ऐकल्यानंतर सीरिजमध्ये देवी देवता आणि हिंदू धर्माबद्दल अपमानास्पद शब्द आणि दृश्यांबद्दल तुम्हाला समजलं होतं. तेव्हा तुम्ही मौन का धारण केलं. निर्मात्यांना अडवलं का नाही. सीरिजमधील अपमानास्पद दृश्य आणि संवाद याला तुमचंही समर्थन होतं का ? जर विरोध होताच तर मग समाजाला विभागणाऱ्या लोकांसोबत काम का केलं ? असे सवाल त्यांनी केले होते.

तैमूरच्या नावावरून सवाल
सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या मुलाचं नाव जैव्हा तैमूर ठेवण्यात आलं. यानंतर अनकेांनी पतौडी कुटुंबावर सवाल केले होते. लोकांचं म्हणणं होतं की, तैमूर मुघलांचा एक क्रूर शासक होता. कुणी आपल्या मुलाचं नाव तैमूर कस ठेवू शकतं. एका मुलाखतीत सैफनं सांगितलं होतं की, तो त्याच्या मुलाचं नाव चेंज करणार होता पंरतु करीनानं त्याला मनाई केली. ती म्हणाली होती की, आपल्या मुलाला आपण कोणत्याही नावानं बोलवावं. ही फक्त त्यांची मरजी आहे नाकी, लोकांची किंवा कुण्या दुसऱ्याची.

सैफ अली खान आणि रावण
आदिपुरुष या सिनेमात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेबद्दल बोलताना सैफनं सांगितलं होतं की, रावण साकारताना मजा येईल. यात रावण वाईट नाही तर मानवी आणि मनोरंजक दाखवला आहे. त्याला आम्ही दयाळू बनवू. यात सीता हरण न्याय्य असेल. आपल्या बहिणीचं नाक कापल्याचा बदला घेण्यासाठी राम आणि रावण यांच्या युद्ध झालं होतं. या विधानानंतर भाजप आमदार राम कदम यांनी सैफवर टीका केली होती. नंतर सैफनंही आपल्या स्टेटमेंटध्ये माफी मागितली होती.