Jawaani Jaaneman : ‘आलिया’च्या आधी ‘सारा’ला ऑफर झाला होता सिनेमा’, सैफचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सैफ अली खानचा आगामी सिनेमा जवानी जानेमन सध्या चर्चेत आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि काही गाणीही रिलीज करण्यात आली आहेत ज्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सिनेमात सैफसोबत तब्बू आणि पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला लिड रोलमध्ये आहे. आलियाचा हा डेब्यू सिनेमा असणार आहे. आलिया सैफच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेबाबत सैफनं एक खुलासा केला आहे. हा सिनेमा आलिया अगोदर सारा अली खानला ऑफर झाला होता असं त्यानं सांगितलं आहे. जवानी जानेमन या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 7 फेब्रुवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे.

या सिनेमाचं प्रॉडक्शनही सैफ अली खान करत आहे. या सिनेमासाठी डायरेक्टर नितीन कक्कर आणि सैफची पहिली पसंती सारा होती. परंतु ती या सिनेमाचा हिस्सा नाही बनली याबाबत सैफनंच खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना सैफ म्हणाला आहे की, “साराला या सिनेमात काम करण्यासाठी आधी विचारलं होता तिनं होकार दिला होता. परंतु नंतर मात्र तिनं नकार दिला.”

पुढे सविस्तर सांगताना सैफ म्हणाला, “केदारनाथा सिनेमा होल्डवर गेला होता. साराकडे कोणताही सिनेमा नव्हता. मी तिला विचारलं की, तू जवानी जानेमन सिनेमा करणार का ? तेव्हा सारानं त्वरीत होकार दिला. परंतु नंतर केदारनाथ सिनेमाची शुटींग पुन्हा सुरू झाली आणि तिला सिंबा या सिनेमाचीही ऑफर आली. नंतर मीच तिला म्हणालो हा सिनेमा तुझ्यासाठी एका बॅकअप्रमाणे होता. जर तुला इतर सिनेमे ऑफर झाले आहेत तर तू हा सिनेमा सोडू शकते. तू इतरांसोबत काम कर. यानंतर सारानंही हा सिनेमा करण्यासाठी नकार दिला.”

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती लव्ह आज कल 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत दिसेल. याशिवाय ती कुली नंबर 1 या सिनेमाच्या रिमेकमध्येही काम करणार आहे. या सिनेमात सारा वरूण धवन सोबत काम करताना दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like