सारा अली खान ‘बेबो’ करीनाला आंटी म्हटल्यानंतर भडकला होता सैफ अली खान ! ‘अशी’ होती रिॲक्शन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan) कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. सारा अली खान आपल्या बिंधास्त वक्तव्य ओळखली जाते. तिनं वडिल सैफ अली खान आणि त्याची दुसरी पत्नी करीना कपूर यांच्या नात्यावरही अनेकदा बिंधास्त वक्तव्य केलं आहे. करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी लग्न केलं तेव्हा सारानं एक प्रश्न केला होता की, ती करीनाला कोणत्या नावानं हाक मारेल.

जेव्हा करीना लग्न करून सैफच्या घरी आली तेव्हा सारा सैफला फोन करण्याचा विचार करत होती की, ती करीनाला काय म्हणून बोलवेल. ती करीनाला बेबो म्हणणार होती. नंतर सारानं विचार केला की, तिला आंटी म्हणूयात. शेवटी तिनं सैफला हाच प्रश्न विचारला.

साराचा प्रश्न ऐकून सैफ देखील हैराण झाला होता. सैफ म्हणाला, तू कोणाला आंटी म्हणतेस. जर करीनाला आंटी म्हटलं गेलं तर मला हे अजिबात आवडणार नाही. आंटी व्यतिरीक्त तिला काहीही म्हण.सारालाही सैफचं म्हणणं पटलं होतं.

आता सारा करीनाला के किंवा करीना म्हणते. सारा आणि करीना यांच्या नात्यात कधीच कोणतं कंफ्युजन नसतं. दोघी चांगल्या मैत्रिणी सारख्या वागतात.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.

You might also like