सैफ अली खानची वेब सीरिज ‘दिल्ली’चं बदललं नाव ! ‘या’ नावानं होणार रिलीज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सैफ अली खान (Saif Ali Khan) चे चाहते त्याच्या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहात आहेत. लवकरच तो एका वेब सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) निर्मित ही सीरिज एक पॉलिटिकल ड्रामा आहे. या सीरिजचं नाव आधी दिल्ली (Delhi) होतं. आता या सीरिजचं नाव बदलून तांडव (Tandava) ठेवण्यात आलं आहे.

सैफ अली खान या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहे. यात 9 एपिसोड असणार आहेत. याचं नाव आधी दिल्ली ठेवण्यात आलं होतं. परंतु आता याचं नाव तांडव ठेवलं गेलं आहे. सैफ यात पंतप्रधानांच्या मुलाचा रोल साकारणार आहे. पीएमची खुर्ची मिळवण्यासाठी सैफ कोणत्या पातळीला जातो, याबद्दल स्टोरी यात आहे.

सीरिजमध्ये सैफ व्यतिरिक्त डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर, तिग्मांशू धुलिया, कृतिका कामरा आणि सारा जैन डियास असे काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या सीरिजद्वारे अली अब्बास जफर डिजिटल डेब्यू करणार आहे. सेक्रेड गेम्स 2 नंतर सैफ पुन्हा एकदा वेब स्पेसमध्ये परत येताना दिसणार आहे.

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच तो बंटी और बबली आणि भूत पोलीस सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय आता त्याच्याकडे तांडव ही वेब सीरिजदेखील आहे. काही दिवसांपूर्वीच तो तान्हाजी सिनेमानंतर जवानी जानेमन सिनेमात दिसला होता. याशिवाय त्यानं कलाकांडी, शेफ, लाल कप्तान अशा काही सिनेमातही काम केलं आहे.

You might also like