Saina Teaser Out : 18 वर्षांनतर होणार नाही ‘गेम’ ओव्हर; ‘सायना’चा टिजर आउट

मुंबई : 2020 मध्ये बॉक्स ऑफिसवर फारकाही फिल्म आल्या नाहीत. पण त्यानंतर 2021 मध्ये अनेक मोठ्या फिल्म रिलिज डेट, टीजर आणि ट्रेलर समोर येत आहेत. आता परिणीती चोप्राची भूमिका असलेला बहुप्रतिक्षित ‘सायना’ येत आहे. बॅडमिंटनपट्टू सायना नेहवाल या बायोपिकमध्ये परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसत आहे. या फिल्मचा टिजर आज रिलिज झाला आहे. ज्यामध्ये परिणीती चोप्राचा दमदार अंदाज समोर आला आहे.

 

 

 

 

परिणीती चोप्रा बॅडमिंटन चॅम्पियन सायना नेहवाल हिची भूमिका साकारत आहे. एक मिनिट 23 सेकंदांच्या या टीजरची सुरुवात देशात मुलगा आणि मुलीच्या भेदभावाच्या मानसिकतेतून सुरु झाली आहे. ‘सायना’च्या टीजरचा बॅकग्राऊंड आवाज परिणीती चोप्रा देत आहे. यामधून ती सायना नेहवालच्या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती देत दिसत आहे. अमोल गुप्ते यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘सायना’मध्ये परिणीती चोप्रा सायना नेहवालच्या लुकमध्ये अगदी फिट दिसत आहे. या टीजरची सुरुवात दमदार डायलॉगपासून सुरु होत आहे. ज्यामध्ये ती सांगत आहे, की देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी आणि यातील निम्मी संख्या महिलांची आहे.

‘राजा बेटा कॉलेज जाएगा मेरा और बेटी चुल्हा फूंकेगी’, असे झाले आहे. तसेच मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर हात पिवळे आणि स्टोरी फिनिश. पण माझ्यासोबत असे काही झालं नाही. मी करछी-तव्याच्या बदल्यात मी तलवार हाती घेतली. परिणिती चोप्रा हिने इन्स्टाग्रामवर याचा टीजर शेअर केला आहे. त्यानंतर तिचे कौतुक केले जात आहे. ही फिल्म 26 मार्चला रिलिज होणार आहे.