जेव्हा वाजिद खाननं हॉस्पिटलमध्ये वाजवला पियानो, व्हिडीओ शेअर करत भाऊ साजिद म्हणतो… (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  प्रसिद्ध सिंगर आणि कंपोजर वाजिद खानचं निधन झालं आहे. वाजिद खान किडनीच्या आजारानं ग्रस्त होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. रविवारी (दि 31 मे) त्याची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्याला चेंबूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या निधनानंतर अजून लोक सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना दिसत आहे. वाजिदचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. भाऊ साजिदनंच हा व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे.

वाजिदच्या निधनानंतर साजिदनं फक्त आपला भाऊच नाही तर एक चांगला साथीही गमावला आहे. आता साजिदनं वाजिदची आठवण काढत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हॉस्पिटलमधील हा व्हिडीओ असून यात वाजिद खान बेडवर बसून मोबाईलवर पियानो वाजवताना दिसत आहे.

व्हिडी शेअर करतना साजिद खूपच इमोशनल झाला आहे. त्यानं व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं की, “दुनिया सुटली, सारं काही सुटलं. तू कधीच म्युझिक सोडलं नाहीस. ना ही म्युझिक तुला कधी सोडेल. माझा भाऊ एक लिजेंड आहे आणि लिजेंड कधी मरत नाहीत. मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहिन. माझ्या सुखात, माझ्या प्रार्थनेत, माझ्या नावात तू कायम राहशील.”