Bollywood Strikes Back : शाहरुख, सलमान, आमिरसह 38 प्रॉडक्शन हाऊस आणि संस्थांनी चॅनल्सवर दाखल केला दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीची प्रतिमा बिघडवण्यावरून 38 फिल्म कंपन्यांनी आणि संस्थांनी दिल्ली हायकोर्टात एक दावा दाखल केला आहे, ज्यामध्ये बॉलीवुडवर बेजबाबदार, अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्य आणि मीडिया ट्रायल्स करण्यापासून काही मीडिया हाऊसेस आणि टीव्ही जर्नालिस्टला रोखण्याची विनंती केली आहे. दावा दाखल करणार्‍यांमध्ये शाहरूख खान, सलमान खान, अजय देवगणच्या कंपन्यांसह अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसचा सहभाग आहे.

मागील चार महिन्यात असंख्य मीडिया रिपोर्टमध्ये बॉलीवुडबाबत खुप काही बोलले गेले. विशेषकरून ड्रग्जच्या तपासादरम्यान अनेक बॉलीवुड सेलेब्रिटीजचा संबंध यामध्ये जोडण्यात आला आणि बॉलीवुडला असे दर्शवण्यात आले, जसे की ड्रग्जसारख्या वाईट गोष्टीचा येथे खुपच बोलबाला आहे. दिल्ली हायकोर्टात दाखल या दाव्यात, रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊचे नाव सुद्धा आहे. सोबतच अर्णव गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर आणि नविक कुमार यांनाही पार्टी बनवण्यात आले आहे.

दाव्यात न्यूज चॅनल्सने प्रोग्रॅम कोडचे पालन करत प्रतिमा खराब करणारा कंटेट हटवण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. आरोप आहे की, चॅनल्सने बॉलीवुडबाबत अतिशय वाईट भाषेचा वापर केला आहे. या दाव्यासाठी 34 मोठे प्रॉडक्शन हाऊस आणि 4 फिल्म संस्था एकत्र आल्या आहेत. फिल्ममेकर विवेक अग्निहोत्रीने या सर्वांच्या नावाची यादी शेयर केली आहे.

या लिस्टनुसार, द फिल्म अँड टेलीव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया, स्क्रीन रायटर्स असोसिएशन, द सिने अँड टीव्ही आर्टिस्टस असोसिएशन आणि इंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्यूसर्स कौन्सिलचा सहभाग आहे. तर आमिर खान प्रोडक्शन्स, शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेन्मेंट, सलमान खान फिल्म, करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन्स, अ‍ॅड-लॅब्स फिल्म, अजय देवगण फिल्मस, अनिल कपूर फिल्म अँड कम्यूनिकेशन नेटवर्क, अरबाज ख़ान प्रोडक्शन्स, आशुतोष गोवारिकर प्रोडक्शन्स, केप ऑफ गुड फिल्म, फरहान अख्तरची एक्सेल एंटरटेन्मेंट, राकेश रोशनची फिल्मक्राफ्ट प्रोडक्शन्स, कबीर ख्रान फिल्म, नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंट, रोहित शेट्टी पिक्चर्स, रिलायन्स बिग एंटरटेन्मेंट, रॉय कपूर फिल्म, सोहेल ख़ान प्रोडक्शन्स, विनोद चोपडा फिल्म, विशाल भारद्वाज पिक्चर्स आणि यशराज फिल्मचा सुद्धा समावेश आहे.