सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘प्रेमभंग’, बॉयफ्रेंडने केलं ‘ब्रेकअप’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतंच एका बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसचं ब्रेकअप झालं आहे. ही अभिनेत्री सलमान खानसोबत 2005 साली आलेल्या सिनेमात दिसून आली होती. यानंतर तिला खास ओळख नाही मिळाली परंतु ती तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. या अभिनेत्रीचा लुक ऐश्वर्यासोबत मिळता जुळता आहे. सध्या ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचे खूप लाँग टाईम रिलेशन तुटले आहे.
Bollywood

आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे, 2005 साली सलमान खानसोबत लकी सिनेमात झळकलेली अभिनेत्री स्नेहा उल्लाल आहे. ती ऐश्वर्या रॉयची डुप्लीकेट म्हणून फेमस आहे. काही दिवसांपूर्वी अशी माहिती समोर आली होती की, स्नेहा ऑल इंडिया मिक्स मार्टिकल आर्टस असोसिएशनचे चेअरमन अवी मित्तल यांना डेट करत आहे. आता अनेक मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहे की, या दोघांचे नाते आता संपले आहे.

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि अवीचं नातं तुटलं आहे. या दोघांनीही सोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला होता. त्यानंतरच दोघांनी एकमेकांना भेटायचं सोडून दिलं. स्नेहा सध्या सिंगल आहे. या रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की, या दोघांचं नातं तुटण्याचं कारण असं आहे की, अवी जास्तीत जास्त वेळ आपल्या कामाला देत होते.

bollywood

असे म्हटले जात आहे की, अवी आणि स्नेहा अनेक दिवसांपासून मित्र होते. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघेही एकमेकांसोबत अनेकदा दिसून येत होते. इतकंच काय तर स्नेहा अवीसोबत फॅमिली फंक्शनमध्येही जात होती.
bollywood

स्नेहाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सलमान खान सोबत डेब्यू केल्यानंतर स्नेहा सलमान खानचा भाऊ सोहैल खानसोबत आर्यन या सिनेमात दिसली होती. स्नेहा बॉलिवूडमध्ये खास काही कमाल दाखवू शकली नाही. हिंदी सिनेमांनंतर तिने साऊथ सिनेमात डेब्यू केला.

You might also like