फार्म हाऊसवर गर्लफ्रेंडसोबत चक्क झाडू मारताना दिसला ‘भाईजान’ सलमान ! व्हायरल होतोय व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कालच (शुक्रवार दि 5 जून 2020) जागितक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. बॉलिवूड स्टार सलमान खान यानंही हा दिवस खास बनवण्याचा प्रयत्न केला आहे. एख व्हिडीओ समोर आला आहे ज्यात सलमान खान फार्म हाऊसवर झाडू मारताना दिसत आहे.

सलमाननं नुकताच त्याच्या इंस्टावरून एकव व्हिडीओ शेअर केा आहे. व्हिडीओत सलमान खान फार्म हाऊसच्या रस्त्यावर झाडून मारताना दिसत आहे. खास बात अशी की, त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर आणि इतर काही स्टाफ मेंबर्सही झाडू मारताना दिसत आहेत. सलमान आणि युलिया दोघांनीही सोशलवर व्हिडीओ शेअर केला आहे आणि साफ सफाईकची काळजी घेण्याचं अपील केलं आहे.

नुकत्याच आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं काही ठिकाणी खूप नुकसान झालं आहे. अनेक भागात तर लोक वीज, पाणी अशा काही बेसिक सुविधांसाठी परेशान आहेत. बॉलिवूड स्टार सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसचंही खूप नुकसान झालं आहे. याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते.

सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिनं चक्री वादळानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. वादळामुळं झालेलं नुकसान यात स्पष्ट दिसत आहे. युलियानं काही फोटो तिच्या इंस्टा स्टोरीवरून शेअर केले होते. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं हे शक्य झालं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like