बायोपिकच्या ‘रेस’मध्ये सुरज पांचोलीची ‘एन्ट्री’, ‘भाईजान’ सलमाननं शेअर केला हवा सिंहचा ‘फर्स्ट’ लुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकाचा काळ सुरू आहे असं दिसत आहे. खास करून स्पोर्ट्स सिनेमे तयार होताना दिसत आहेत. आता बारी आहे ती म्हणजे आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली याची. सुरज पांचोली स्टारर एका स्पोर्ट्स बायोपिक सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. बॉक्सर हवा सिंह यांच्यावर आधारीत या सिनेमाची घोषणा बॉलिवूड स्टार सलमान खाननं केली आहे. सलमाननं सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे.

सलमाननं ट्विटरवरून हवा सिंहचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. ट्विट करत सलमान म्हणतो, “हवा से बाते करेंगे सिंह.” सिनेमातील सुरजचा लुक खूपच क्लासिक दिसत आहे. त्याची बॉडीही शानदार दिसत आहे. सलमाननं पूर्वीच सुरज पांचोलीला लाँच केलं आहे. त्यानं सुरजचा पहिला सिनेमा हिरो प्रोड्युस केला होता. त्याच्यासोबत अथियानंही आपला बॉलिवू़ड डेब्यू केला होता.

कोण आहेत हवा सिंह ?

हवा सिंह यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हवा सिंह यांना भारतीय बॉक्सिंगचा फादर म्हटलं जातं. हवा सिंह त्यांच्या काळातील आयकॉनिक बॉक्सर होते. हवा सिंह भारतीय आर्मीचे सदस्य होते. हरियाणात जन्मलेल्या हवा यांनी बॉक्सिंगमुळे खूपच नाव कमावलं आहे. 1966 च्या एशियाड आणि 1970 च्या एशियाडमध्ये सलग गोल्ड मेडल मिळवलं होतं. त्यांना अर्जुन अवॉर्डही मिळाला आहे. प्रकाश नंबियार हा सगळा प्रवास पडद्यावर दाखवणार आहेत. एस फर्नांडिस आणि कमलेश सिंह कुशवाहा हा सिनेमा प्रोड्युस करणार आहेत.