Video : ‘भाईजान’ सलमान खानने ‘हटके’ अंदाजात पूर्ण केले ‘बॉटलकॅप चॅलेंज’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये बॉटलकॅप चॅलेंजचा ट्रेंड सुरु आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने आपल्या सुपर किकने बाटलीचे झाकण पाडले होते. यानंतर अनेक कलाकरांनी हे चॅलेंज स्विकारले आणि पूर्ण केले. यादरम्यान सोशल मीडियावर अनेक फनी व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने या चॅलेंजला स्विकारत करत ते पूर्ण केले आहे आणि खास व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाईजान सलमान खान सोशलवर अ‍ॅक्टीव असतो. सलमान खानने रविवारी आपल्या इंस्टग्रामवरून बॉटलकॅप चॅलेंज पूर्ण केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत सलमानने अक्षयसारखी किक तर नाही मारली. परंतु चाहत्यांना मात्र एक मोलाचा संदेश यातून दिला आहे.

व्हिडीओत दिसत आहे सलमान खानने किक मारण्याऐवजी फूक मारत बॉटलकॅप चॅलेंज पूर्ण केले आहे. यानंतर दिसतं की, सलमान खान सगळं पाणी पिऊन टाकत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सलमान खान म्हणतो की, “डोन्ट थकाओ, पानी बचाओ” स्पष्ट आहे की, सलमान खान या व्हिडीओतून चाहत्यांना पाणी वाचवण्यासाठी मेसेज देत आहे.” सलमान खानने हा व्हिडिओ जीममध्ये शुट केला आहे.

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, नुकताच ईदला सलमानचा भारत सिनेमा रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लवकरच सलमान खान दबंग 3 सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खानचा दबंग 3 सिनेमा 20 डिसेंबर 2019 रोजी रिलीज होणार आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या