आता ‘गळाभेट’ घेणार नाही ‘भाईजान’ सलमान ? Coronavirus पासून वाचण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसची दहशत दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. बॉलिवूडमधील कलाकारांमध्येही याची भीती पसरली आहे. बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानही कोरोनाला घाबरला आहे. त्यानं आगामी सिनेमा राधेची शुटींगही रद्द केली आहे. याशिवाय त्यानं कोरोनापासून वाचण्यासाठी चाहत्यांना खास सल्लाही दिला आहे.

रिपोर्टनुसार असं सांगितलं जात आहे की, सलमान खानला राधे या सिनेमाच्या शुटींगला थायलंडला जायचं होतं. परंतु कोरोनाच्या भीतीनं त्यानं मुंबईतच शुटींग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानं आपला थायलंड दौरा रद्द केला. त्यानं थायलंडची शुटींगही मुंबईला करण्याचा निर्णय घेतला. परंतु याबाबत अद्याप अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.

कोरोनापासून वाचण्यासाठी सलमाननं चाहत्यांना टीपही दिली आहे. सलमाननं एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो जीममध्ये बसला आहे. तो हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना सलमान म्हणतो, “नमस्कार आपल्या संस्कृतीनुसार, नमस्ते आणि सलाम आहे. जेव्हा कोरोना व्हायरस संपेल तेव्हा हात मिळवा आणि गळाभेट घ्या.” म्हणजेच समलान खान चाहत्यांना गळाभेट न घेण्याची आणि हात न मिळवण्याचा सल्ला देत आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये बिजी आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.