ठरलं ! ‘या’ दिवशी रिलीज होणार सलमान-प्रभूदेवाचा ‘दबंग – 3’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानचा चित्रपट दबंग ३ च्या रिलीजची तारीख निश्चित झाली आहे. स्वतः सलमान खानने डायरेक्टर प्रभुदेवासोबत फोटो शेयर करत रिलीजची तारीख सांगितली. हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार आहे. यासह आणखी एक महत्वाची माहिती समोर आली की हा चित्रपट एका नव्हे तर दोन नव्हे तर चार भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सलमान खानचा दबंग-३ हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. आता भाईची लोकप्रियता इतकी वाढली आहे की हा चित्रपट चार भाषांमध्ये रिलीज करावा लागला आहे.

हे कलाकार आहेत विशेष भूमिकेत
या चित्रपटात सलमान खानच्या व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, विनोद खन्नाचा भाऊ प्रमोद खन्ना विशेष भूमिकेत दिसून येणार आहे. विनोद खन्ना दंबग सीरीजच्या मागच्या चित्रपटांमध्ये सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत होते. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचा भावाला या भूमिकेसाठी अप्रोच केले आहे. असे म्हटले जात होते की धर्मेंद्र सलमानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसू शकतो. पण प्रमोद खन्ना, सलमान आणि सोनाक्षीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर या अफवांना ब्रेक लागला. ‘दबंग’ च्या तिसर्‍या हप्त्यात डिंपल कपाडिया देखील दिसेल. जरी या चित्रपटातील त्याचे पात्र यापूर्वीच मृत झाले होते, परंतु दबंग ३ मधील काही महत्त्वाच्या फ्लॅशबॅक दृश्यासाठी डिंपल कपाडिया यांना साइन केले होते.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like