‘भाईजान’ सलमाननं पूर्ण केलं वचन ! पूरग्रस्त गावात बनवतोय 70 घरं

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड स्टार सलमान खान कायमच लोकांची मदत करताना दिसला. याआधी सलमान खाननं फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या खिद्रापूर गावात लोकांना घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं. सलमाननं आता हा शब्द पूर्ण केला आहे.

फेब्रुवारीत सलमान खाननं एका कंपनीच्या मदतीनं गावात अशात लोकांना घर बांधून देण्याचं वचन दिलं होतं ज्यांचं घर 2019 मध्ये आलेल्या पुरात वाहून गेलं होतं. सलमान खाननं इंस्टावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती.

सलमानच्या या वचनानंतर आता गावातील लोकांचं घर बनण्याचं काम सुरू झालं आहे. अलीकडेच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाटील यांनीही यासंदर्भात माहिती दिली होती. त्यांनी ट्विट करत सांगितलं होंत की, 70 प्रभावित घरांचं काम सुरू झालं आहे. यात त्यांनी सलमान खानचाही उल्लेख केला होता या दरम्यानच्या भूमी पूजनाचे फोटोही त्यांनी शेअर केले होते.

असंही सांगितलं जात आहे की, या कार्यासाठी राज्य सरकारनं 95 हजार रुपये दिले आहेत. बाकी खर्च सलमान खान व एलान फाऊंडेशन करणार आहे. 250 स्क्वेअर फूटांची घरं बनवून दिली जाणार आहेत अशी माहिती आहे.