सलमान खानचे सिक्रेट वाचून व्हाल चकित ; ‘हे’ आहेत सलमानचे प्रदर्शित न झालेले १० चित्रपट
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या त्याचा सिनेमा भारतला घेऊन खूपच चर्चेत आहे. बॉलिवूडचा सुलतान सलमान खान याच्याविषयी आज एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत ते वाचून तुम्ही थक्क व्हाल. अनेक दिग्दर्शक सलमानला सिनेमात घेण्यासाठी लाईन लाऊन असतात. सलमान त्याच्या मनाचा राजा आहे. तो हवं त्याला बॉलिवूडमध्ये लाँच करू शकतो. तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत, सलमानचे असे काही सिनेमे आहे जे थिएटरपर्यंत पोहोचलेच नाहीत. जे कधी प्रदर्शित झालेच नाहीत. याच सिनेमांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
१. ऐ मेरे दोस्त
सलमान खान पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा प्यार किया तो डरना क्या मध्ये दिसला होता. त्याआधी हे दोघे भाऊ ऐ मेरे दोस्त या सिनेमात एकत्र दिसणार होते. या सिनेमात दिव्या भारती आणि करिश्मा कपूर दिसणार होत्या. एका अपघातात दिव्या भारती यांचं निधन झालं. त्यानंतर सिनेमाच्या कामाला पूर्णविराम भेटला. यासाठी रेकॉर्ड केलेल्या गाण्याचा वापर सलमानच्या मंझधार या सिनेमासाठी केला गेला.
२. राम
सोहैल खान आणि सलमान खान राम या सिनेमात एकत्र दिसणार होते. या सिनेमाच्या कामालाही सुरुवात झाली होती. परंतु काही क्रिएटीव्ह कारणांमुळे या सिनेमाचे काम थांबले आणि नंतर तर या सिनेमाचा विचार सोडून देण्यात आला. या सिनेमासाठी पूजा भट्ट आणि अनिल कपूर यांना साईन करण्यात आले होते.
३.दस
दस हा सिनेमाही असा आहे जो बनलाच नाही. या सिनेमात सलमान आणि संजय दत्त एकत्र दिसणार होते. दिग्दर्शक मुकुल एस आनंद यांच्या निधनामुळे सिनेमाला पूर्ण विराम लागला. या सिनेमातील गाणं सुनो गौर से दुनियावालो हे गाणं सर्वांनाच माहिती आहे. सिनेमातील संगीत १९९९ मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.
४. राजू, राजा, राम
डेविड धवन यांनी सलमान खान सोबत जुडवा सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा केला आहे. डेविड गोविंदा, सलमान आणि जॅकी श्रॉफ यांना घेऊन ‘राजू, राजा, राम’ हा सिनेमा करणार होते. कोणताही निर्माता न मिळाल्याने हा सिनेमा बनवण्याचा विचार सोडून देण्यात आला. यानंतर त्यांनी जुडवा सिनेमा केला.
५. आंख मिचोली
जुडवा सिनेमाच्या यशानंतर अनीज बज्मी हे सलमानला घेऊन आंख मिचोली हा सिनेमा करणार होते. परंतु सलमान खूपच व्यस्त होता शिवाय त्याला पुन्हा डबल रोल करण्याचा मूड नव्हता. त्यामुळे हा सिनेमा काही बनू शकला नाही. अनीज बज्मी यांनी सलमानला घेऊन नो एंट्री(2005) हा सिनेमा केला.
६. बुलंद
या सिनेमात सलमान खान सोबत सोमी अली प्रमुख भूमिकेत होती. या सिनेमाचे अर्ध्याहून शुटींग झाले होते. खूप खर्चिक असा हा सिनेमा होता. परंतु काही कारणामुळे हा सिनेमा पूर्ण झाला नाही. यावेळी सलमान आणि सोमी यांच्या अफेअरचीही चर्चा होती.
७. चोरी मेरा नाम
या सिनेमात सलमान खान सोबत सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, काजोल असे स्टार दिसणार होते. हा सिनेमाही कारण अज्ञात कारणाने पूर्ण होऊ शकला नाही. या सिनेमातील सलमान आणि सुनील यांच्यावर चित्रीत करण्यात आलेला एक स्टंटचा सीन पुढे एका कोल्डड्रिंकच्या जाहिरातीचा भाग बनला.
८. जलवा
केतन धवन यांनी सलमान खान आणि संजय दत्त यासोबतच अरमान कोहली यांना साईन केले होते. परंतु हा सिनेमा पुढे नेण्याआधी या सिनेमाचा विचार सोडून द्यावा लागला. दरम्यान डेविड धवन यांनी सलमानला घेऊन ये ही जलवा हा सिनेमा केला आहे.
९. ‘सागर से गहरा प्यार’
सागर से गहरा प्यार हा सिनेमा केवळ घोषणेपुरताच राहिला. हा सिनेमा बनू शकला नाही. या सिनेमात सलमान खान सोबत रवीना टंडन दिसणार होती.
१०. ‘हैंडसम’
या सिनेमात सलमान खान सोबत संगीता बिजलानी दिसणार होत्या. परंतु हा सिनेमाही कधी बनू शकला नाही. दरम्यान, अनीज बज्मी नो एंट्री चा सेकंड पार्ट नो एंट्री में एंट्री बनवणार होते. परंतु काही कारणामुळे हा सिनेमा बनू शकला नाही. २००५ येता येता सलमान खानचे स्टारडम आकाशाला भिडले होते. त्यानंतर सलमानचा एक सिनेमा अर्ध्यात राहिला नाही.