पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सलमान खाननं आजवर अनेक अॅक्ट्रेसला लाँच केलं आहे. याआधी अनेकदा अशा बातम्या आल्या आहेत की, सलमान खान त्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिला सिनेमात लाँच करू शकतो. आता पुन्हा एकदा दीर्घकाळानंतर असं ऐकण्यात येत आहे की, सलमाननं युलियाला लाँच करण्याचं मन बनवलं आहे. लवकरच युलिया बॉलिवूड डेब्यू करू शकते.
एका इंग्रजी वृत्तानुसार, सलमानच्या जवळच्यानं माहिती दिली आहे की, लवकरच सलमान युलियाला घेऊन मोठी अनाऊंसमेंट करू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही अनाऊंसमेंट लॉकडाऊननंतर सर्वकाही ठिक झाल्यानंतर केली जाऊ शकते. युलिायानं याआधी सिंगिंगमध्ये नशीब आजमावलं आहे.
असंही सांगितलं जात आहे की, युलिया सलमानचा आगामी प्रॉडक्शन सिनेमा कभी ईद कभी दीवाली मध्ये दिसण्याची शक्यता आहे. असं असलं तरी अद्याप अधिकृत माहिती समोर येणं बाकी आहे. कारण याआधीही अशा अनेक बातम्या समोर आल्या ज्या नंतर चुकीच्या असल्याचं समोर आलं. यापूर्वी युलिया डायेरक्टर प्रेम सोनीच्या सिनेमात दिसणार होती.
युलिया सध्या सलमान खानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर असून त्याच्यासोबत रहात आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही आहे.