Video : ‘दबंग’ सलमान खानचा ‘हा’ व्हिडीओ प्रचंड ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सलमान खान त्याच्या फिटनेसची विशेष काळजी घेत असतो. 90 च्या दशकापासून त्याचा फिटनेस युवकांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. नुकताच सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा सलमानच्या वर्कआऊटचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तरुणांनाही घाम फुटेल.

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवरून त्याचा वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिसत आहे सलमान खान लेग प्रेस एक्सरसाईज करत आहे. यात चकित करणारी गोष्ट अशी आहे की, सलमानने लेग प्रेस मशीनला केवळ भरमसाठ वेट नाही लावलेलं तर, दोन व्यक्तींना त्यावर बसवलं आहे. सलमान एवढं प्रचंड वजन खूपच सहजतेने उचलताना दिसत आहे. हे पाहून एखाद्याला नक्कीच चक्करही येऊ शकते. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना वजनावर बसलेले ते दोघे कोण आहेत ? हे सलमानच्या सेक्युरीटीमध्येच तैनात असतात.

भाईजान सलमान खानने या त्याच्या वर्कआऊट व्हिडीओ खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये सलमान खान म्हणतो की, “अनेक चढ उतारांचा सामना केल्यानंतर माझ्या सेक्युरीटीला या गोष्टीची जाणीव झाली आहे की, ते माझ्यासोबत किती सुरक्षित आहेत.”

या ईदला सलमान खानचा भारत सिनेमा रिलीज झाला. 2018 मध्ये या सिनेमाच्या तयारीवेळी सलमानने प्रचंड मेहनत घेतली आहे. रेस 3 साठीही त्याने सिक्स पॅकअ‍ॅब्ज बनवले होते. सलमानने अनेक बॉलिवूड स्टार्सनाही फिटनेस ट्रेनिंग दिली आहे. सलमान खान किती फिट आहे आणि त्याला अ‍ॅक्शन किती आवडते हे योहानच्या बर्थडेलाच पाहायला मिळाले आहे. त्याचाही व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. योहान हा सोहेल खानचा मुलगा आणि सलमानचा पुतण्या आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘ध्यान’धारणा केल्याने ‘हे’ आजार होतात बरे

दीर्घायुष्यासाठी ‘हे’ आसन करा

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

वयोवृद्धांसाठी ‘योगा’ हे ‘वरदान’च

You might also like