‘भाईजान’ सलमान करणार ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘ही’ अभिनेत्री मुख्य भूमिकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान लवकरच त्याचा आगामी सिनेमा कधी ईद कभी दिवाली या सिनेमात दिसणार आहे. अलीकडेच त्यानं सिनेमाची अनाऊंसमेंट केली होती. यानंतर चाहत्यांना सिनेमातील लिड अ‍ॅक्ट्रेसबद्दल उत्सुकता होती. या सिनेमातील लिड अ‍ॅक्ट्रेसचाही खुलासा झाला आहे. पूजा हेगडे या सिनेमात प्रमुख भूमिकेत काम करताना दिसणार आहे.

प्रोड्युसर साजिद नाडियाडवालानं पूजा हेगडेच्या एन्ट्रीबद्दल एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. साजिद एका मुलाखतीत बोलताना म्हणाला, “पूजा हेगडे सोबत हाऊसफुल 4 मध्ये काम केल्यानंतर मला असं जाणवलं की, ती या रोलसाठी परफेक्ट आहे. ती या स्टोरीत खूप नाविन्य घेऊन येईल.”

सिनेमातील पूजाच्या रोलबद्दल सांगताना साजिद म्हणतो, “पूजा सिनेमातील एका लहान गावात राहणाऱ्या मुलीचा रोल करणार आहे जी सलमान खानची प्रेयसी असते. परंतु सिनेमात सलमान आणि पूजाचा स्वभाव खूपच वेगळा असतो. कभी ईद कभी दिवाली हा एक फॅमिली ड्रामा सिनेमा आहे.

पूजाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती सलमानसोबत कभी ईद कभी दिवाली सिनेमात दिसणार आहे. पूजानं याआधी अक्षय कुमारसोबत हाऊसफुल 4 आणि ऋतिक रोशनसोबत मोहन जोदडो या सिनेमात लिड रोल केला आहे. यानंतर आता ती समलानसोबत लिड रोल करणार आहे. पूजानं साऊथमधील अनेक सिनेमात काम केलं आहे.