गणेश विसर्जनादरम्यान ‘भाईजान’ सलमान चक्‍क सिगारेटचे ‘दम’ मारतोय (व्हिडीओ)

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सलमान खान इंडस्ट्रीचे दंबग समजला जातो. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची आणि कॅमेरांची त्यांच्यावर कायमच नजर असते. सलमान खान गणेश विसर्जनाच्या क्षणी अत्यंत उत्साहात असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांने डान्स देखील केला. त्याची चर्चा सोशल मिडियावर देखील रंगली. परंतू आता सलमान खान पुन्हा एकदा सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला परंतू आता तो चाहत्याकडून ट्रोल झाला आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्याच सलमान सिगरेट ओढताना दिसत आहे.

त्या सलमान विसर्जन दरम्यान सिगरेट ओढताना दिसत आहे. त्याच दरम्यान त्याचा व्हिडिओ कोणीतरी सोशल मिडियावर व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, त्याच्या बाजूला त्याचा बॉडीगार्ड शेरा उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या बाजूला एक दुसरा व्यक्ती देखील आहे. पहिल्यांदा सलमान त्या दोघांशी बोलताना दिसत आहे परंतू नंतर सलमान अचानक सिगारेट काढून ओढायला लागतो.

या आधी सलमान खान गणपती आरतीवरुन देखील ट्रोल झाले आहेत. सलमान खानने आरतीच्या वेळी आपल्या भाच्याला म्हणजेच आहिलला अंगावर उचलून घेतले आहे. त्यामुळे त्याने आरतीचे ताट चूकीच्या दिशेला फिरवले. सलमान खानची ही बाब लोकांना आवडली नाही आणि त्याला ट्रोल केले.
सलमान सध्या त्याचा नवा येणारा सिनेमा दबंग 3 च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सोनाक्षी सिन्हाची देखील महत्वाची भूमिका आहे. तसेच सलमान ‘किक 2’ हा सिनेमा बनवण्यात व्यग्र आहे. अशी शक्यता मागली जात आहे की हा सिनेमा 2020 च्या ईदाला रिलीज करण्यात येईल.