‘भाईजान’ सलमान बहिण अर्पिताचा पती आयुष शर्मावर उचलणार ‘हाथ’ ?

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलवूड स्टार सलमान खाननं अनेक कलाकारांना इंडस्ट्रीत लाँच केलं आहे.  आयुष शर्मा त्यापैकीच एक आहे. सलमाननं आयुषला लव यात्री या सिनेमातून लाँच केलं होतं. हा सिनेम खास काही चालला नाही. अशी माहिती आहे की, सलमान खान लवकरच आपला जीजू आयुष शर्माला घेऊन एक सिनेमा करणार आहे. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, सलमान खान 2018 साली आलेल्या मुळशी पॅटर्न या मराठी सिनेमाचा रिमेक करणार आहे. हा सिनेमा तेव्हाचा हिट सिनेमा आहे. लवकरच याचा रिमेक तयार केला जाणार आहे.

राधे सिनेमानंतर या सिनेमावर काम सुरू केलं जाणार आहे. असंही समजत आहे की, मुळशी पॅटर्नच्या या रिमेक सिनेमात सलमान खान एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. स्टोरी आयुष शर्माच्या भोवती फिरणार आहे तर सलमान खान सपोर्टींग रोल साकारणार आहे. आयुष शर्मा एका गँगस्टरचा रोल साकारणार आहे ज्याला सलमान खान पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठी सिनेमात तर हा दबंग पोलीस अधिकारी त्या गँगस्टरला मारहाण करताना दिसतो. परंतु हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की, समलान खान आपल्या जीजूवर हात उचलतो की, नाही.

मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक होणार असल्याचं समजल्यानंतर डायरेक्टर प्रविण तरडे हेदेखील खुश आहेत. मुळशी पॅटर्न हा सिनेमा प्रविण तरडेनं डायरेक्ट केला होता आणि त्यांनी लिहिला होता. सलमान खान आणि अरबाज खानला या सिनेमाची कॉन्सेप्ट खूप आवडली आणि त्यांनी हा सिनेमा साईन केला. सलमान सिनेमाचे अधिकार घेतले आहेत. परंतु हा सिनेमा प्रविण तरडे नाही तर अभिराज मीनावाला डायरेक्टर करणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like