सलमान खानचे कुटुंबिय सुद्धा झाले क्रिकेट टीमचे मालक, IPL सारख्या ‘या’ लीगमध्ये देणार विरोधी टीम्सला टक्कर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड कलाकारांचे क्रिकेट प्रेम सर्वांनाच माहित आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक कलाकारांच्या स्वताच्या टीम आहेत. यासोबतच आता बॉलीवुडचा ’दबंग’ सलमान खानच्या कुटुंबियांनी सुद्धा आपली एक क्रिकेट टीम खरेदी केली आहे. होय, आयपीएल प्रमाणे श्रीलंकेत सुरू होत असलेल्या श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये सलमान खानचा छोटा भाऊ सोहेल खानने एका टीमची फ्रेंचायजी खरेदी केली आहे.

सोहेल खानची टीम कँडी टस्कर्स
मीडिया रिपोर्टनुसार 21 नोव्हेंबरपासून श्रीलंका प्रीमियर लीगची सुरूवात होणार आहे, ज्यामध्ये पाच टीम सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये पाच टीम सहभागी होणार आहेत आणि त्या पाच टीमपैकी कए टीम कँडी टस्कर्स सोहेल खानची आहे. ही गुंतवणूक सोहेल खान इंटरनॅशनल एलएलपीद्वारे करण्यात आली आहे. या गुंतवणुकीचा भाग सलीम खान आणि सलमान खान सुद्धा आहेत.

टीमध्ये क्रिस गेल असणार
या लीग मध्ये कँडी टस्कर्सची टक्कर कोलंबो किंग्स, दांबुला हॉक्स, गॅल ग्लेडिएटर्स आणि जाफना स्टालियन्सशी होणार आहे. सोहेलच्या टीमध्ये वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडून क्रिस गेल असणार आहे. क्रिस गेल षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर सोहेल खान सुद्धा त्यास टीमचा महत्वाचा भाग मानतो. वर्कफ्रंट बाबत बोलायचे तर सलमान लवकरच आपल्या मोस्ट अवेटेड ’राधे’ मध्ये दिसणार आहे.

You might also like