Who is Sameer Wankhede : ‘या’ अभिनेत्रीचा नवरा समीर वानखेडे, जो करतोय रिया चक्रवर्तीच्या ड्रग अँगलचा तपास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण ड्रग अँगल समोर आल्यानंतर आता वेगळच वळण घेत आहे. या ड्रग अँगल मधून समोर येणाऱ्या खुलाशांमुळे अनेकजण हैराण आहेत. ड्रग अँगल नंतर आता नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो टीम अधिक तपास करत आहे. NCB टीमने सुशांत सिंह प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीच्या घरावर छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो टीम रियाच्या मुंबईमध्ये असलेल्या घरी पोहचली. तर दुसरीकडे सॅम्युअल मिरांडाच्या घरी देखील छापा टाकण्यात आला. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो टीममध्ये एक असा अधिकारी सहभागी आहे की ज्याचं नाव समोर आल्यावर सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. हा दुसरा तिसरा कोणी नसून समीर वानखेडे आहे. समीर वानखेडेला मुंबईचा सर्वात कडक ऑफिसर मानलं जातं. समीर वानखेडेची पत्नी एक नामवंत अभिनेत्री आहे. या तर जाणून घेऊ समीर वानखेडे आणि त्याच्या पत्नीबद्दल काही गोष्टी…

सेलिब्रिटिंना भाव देत नाही समीर वानखेडे
जॉईंट डायरेक्टर समीर वानखेडे बद्दल म्हटलं जातं की ते कोणाला भाव देत नाहीत. त्यांना मुंबई पोलिसातील आत्तापर्यंतचा सर्वात कडक ऑफिसर मानलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, रामगोपाल वर्मासह अनेक बॉलिवूड अभिनेत्यांच्या घरावर छापे टाकले आहेत. जेव्हा 2013 साली गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर विदेशी करन्सीसह पकडण्यात आलं होतं तेव्हा देखील समीर वानखेडेनीच त्याच्यावर कारवाई केली होती.

पत्नी आहे नामवंत अभिनेत्री
समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर एक नामवंत अभिनेत्री आहे. 2003 साली आलेल्या ‘गंगाजल’ या सिनेमात अजय देवगन सोबत काम केलं होतं. ‘गंगाजल’ या सिनेमात क्रांतीने अपूर्वा कुमारीची भूमिका साकारली होती. तिने अनेक टीव्ही सिरीयल मध्ये देखील काम केलं आहे. पण क्रांती रेडकर बॉलिवूड ऐवजी मराठी सिनेमात काम करताना दिसून येते. तिने अनेक इंग्रजी सिनेमांमध्येही काम केलं आहे. अभिनयासोबत तिने डायरेक्शनचं देखील काम केलं आहे.