Video : पती मुफ्ती अनस सोबत हनिमूनसाठी काश्मीरला पोहोचली सना खान ! व्हिडिओत दिसला खास अंदाज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    एक्स टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आणि बिग बॉस स्पर्धक सना खान (Sana Khan) हिनं तिच्या चाहत्यांना इंडस्ट्री सोडत झटका दिला होता. तिनं घोषणा केली होती की, मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी ग्लॅमरची दुनिया सोडत आहे. यानंतर सना खाननं 20 नोव्हेंबर रोजी अचानक सुरत, गुजरातमध्ये मुफ्ती अनस (Mufti Anas) नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. सना खान आणि मुफ्ती अनस यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर सतत काही ना काही कारणानं सना चर्चेत येताना दिसत आहे. तिचे फोटो किंवा व्हिडिओ सतत अटेंशन घेताना दिसत आहेत.

सना पती मुफ्ती अनस सोबत हनिमूनसाठी रवाना झाली होती. सनानं पती सोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत आणि याबाबत माहिती दिली आहे, आपल्या हनिमूनसाठी ती काश्मीरला पोहोचली आहे. तिथूनही तिनं काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

सध्या सनाचे पती सोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. चाहतेही यावर कमेंट करत भावना व्यक्त करताना दिसत आहेत.

सनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 2014 मध्ये आलेल्या सलमान खानच्या जय हो सिनेमात तिनं काम केलं आहे. याशिवाय ती बिग बॉस 6 मध्येदेखील दिसली आहे. एक टीव्ही अ‍ॅक्ट्रेस म्हणूनही ती खूप फेमस होती.