संजना संघीच्या नव्या जाहिरातीवर प्रचंड भडकली पूजा बेदी, म्हणाली – ‘पुरुषांविरोधात…’

पोलीसनामा ऑनलाईन –  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चा अखेरचा सिनेमा‘दिल बेचारा’ (Dil Bechara) मधील अ‍ॅक्ट्रेस संजना संघी (Sanjana Sanghi) सध्या एका जाहिरातीमुळं चर्चेत आहे. संजना सध्या लायन्सगेट प्ले (Lionsgate Play) च्या एका जाहिरातीत दिसत आहे. परंतु या जाहिरातीवर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. पुरुषांविरोधातील हिंसाचाराला ही जाहिरात प्रोत्साहन देत आहे असं म्हटलं जात आहे. अ‍ॅक्ट्रेस पूजा बेदी (Pooja Bedi) हिनं यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली आहे की, पुरुषांविरोधातील घरगुती हिंसाचार स्विकार्य नाही. ट्रोल झाल्यानंतर लायन्सगेट प्ले नं जाहिरातीचं हे ट्विटही डिलीट केलं आहे.

सोशलवर या जाहिरातीवर जोरदार निशाणा साधला जात आहे. अ‍ॅक्ट्रेस पूजा बेदी हिनंही जाहिरात रिट्विट करत राग व्यक्त केला आहे. पूजानं लिहिलं की, ही जाहिरात पाहणं खूप भयावह आहे. पुरुषांविरोधातील घरगुती हिंसाचार स्विकार्य नाही. जर हेच पुरुषानं तिच्या कानशिलात लगावल्या असत्या तर ? असा सवालही तिनं केला आहे.

अनेक युजर्सही यावर टीका करताना दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी जाहिरातीच्या कॉन्सेप्टबद्दल सवाल उपस्थित केले आहेत. अनेकांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जाहिरातीत नेमकं आहे तरी काय ?

जाहिरातीत दिसत आहे की, संजना तिच्या मेल कोस्टारला आठवेळा कानशिलात लगावत आहे. ते फक्त एवढ्यासाठी की, ओटीटीवर किती नंबरचा सिनेमा पहायचा हे सांगण्यासाठी. तब्बल 8 वेळा कानशिलात लगावल्यानंतर ती म्हणते की, 8 नंबरचा सिनेमा पाहूयात.