Video : सुशांत आणि संजना संघीचा कपल डान्स करतानाचा ‘अनसीन’ व्हिडीओ सोशलवर व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन एका महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्याचा अखेरचा सिनेमा आहे दिल बेचारा. लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि दोन गाणीही रिलीज झाली आहेत. दिल बेचारामधील त्याची कोस्टार अभिनेत्री संजना संघी हिनं सुशांत सोबतचा एक अनसीन व्हिडीओ शेअर केला आहे हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही काहीसे इमोशनल व्हाल.

संजनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती सुशांत सिंह राजपूतसोबत रोमँटीक कपल डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिन इमोशनल करणारा मेसेजही लिहिला आहे. तिनं हेही सांगितलं आहे सुशांतनं कसं तिला डान्ससाठी विचारलं होतं.

संजनानं शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनीही यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. चाहते पुन्हा एकदा काहीसे भावूक झाल्याचं दिसत आहे.

मुकेश छाबडा डायरेक्टेड दिल बेचारा हा सिनेमा 24 जुलै रोजी डिजिटल प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. खास बात अशी की, प्लॅटफॉर्मचे सब्सक्रायबर्स आणि नॉन सब्सक्रायबर्स असे सारेच हा सिनेमा पाहू शकणार आहेत.