संजय दत्तची लाडकी ‘त्रिशाला’नं शाहरुख खानसोबत केलं होतं फोटोशुटं ! म्हणाली – ‘माहिती नाही कधी काढलाय फोटो’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – बॉलिवूड स्टार   संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त हीनं शाहरुख खानसोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. त्रिशालानं हा फोटो कधीचा आहे याचा खुलासा केला आहे. तिनं या फोटोसाठी शाहरुखचे आभारही मानले आहेत.

त्रिशालानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती शाहरुख खानसोबत दिसत आहे. हा थ्रोबॅक फोटो शेअर करताना त्रिशाला म्हणते, “या फोटोसाठी धन्यवाद. हा फोटो कधीचा आहे हे माझ्या लक्षात नाही. बहुतेक 90 च्या दशकाच्या सुरुवातीचा आहे.”

https://www.instagram.com/p/B_RKzkjlkneKgAJ0ASjdbjXq7E2lsEVR45ppi40/

त्रिशालानं शेअर केलेला हा थ्रोबॅक फोटो साऱ्यांनाच आवडला आहे. सध्या या फोटोची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B7p9KPPl5AQIJ2CQ67oRR0Wf9bIa_LhJ9WiLyQ0/

त्रिशाला दत्त आज काल इंडिया आणि इथल्या लोकांना खूप मिस करत आहे असं दिसत आहे. ती सतत थ्रोबॅक फोटो शेअर करताना दिसत आहे. अलीकडेच तिनं आई रिचा शर्मा सोबत काही अविस्मरणीय आणि इमोशनल आठवणी शेअर केल्या होत्या. यात नन्ही त्रिशाला आपल्या आईच्या मांडीवर बसल्याचं दिसलं होतं. त्रिशालाचे हेही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

https://www.instagram.com/p/B4WMPkAlZerNCcXBXiAB3B4TY-9Dw2CRT7bPvA0/

https://www.instagram.com/p/ByxYM8QFLCY8dGxM-Sq5bvcqt7MBgVU0ryqr_s0/

https://www.instagram.com/p/BtIjk5xlzejdIxu_mXI-PrMD_5ONaOw3rya6t40/