संजय दत्तच्या KGF-2 सिनेमा विरोधातील याचिका कर्नाटक हायकोर्टानं फेटाळली

नवी दिल्ली: वृत्त संस्था – बॉलिवूड अभिनेता संजय दत्त स्टारर चित्रपट सडक -2 लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. याशिवाय संजय दत्त केजीएफ -2 सह सुमारे 6 चित्रपटावर काम करत आहे. केजीएफ -2 चा संजय दत्तचा लूक रिलीज झाला असून, या अभिनेत्याने अधीराची भूमिका साकारली आहे. दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयात हा चित्रपट रिलीज होण्याविरोधात आणि संजय दत्तच्या कामाविरूद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आता हायकोर्टाने ही याचिका रद्द केली आहे.

या याचिकेत संजय दत्तला चित्रपटातून बाहेर काढण्याची व चित्रपट प्रदर्शन स्थगित करण्याची मागणी करण्यात आली होती. मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या संजय दत्तला राज्यातील लोक विरोध करीत आहेत या कारणावरून याचिका दाखल करण्यात आली होती. या पैलूंच्या आधारे याचिकाकर्ता जी. शिवशंकर, अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या दिशानिर्देश जारी करण्यास सांगितले.

परंतु मुख्य न्यायाधीश अभय श्रीनिवास ओका आणि न्यायमूर्ती अशोक एस. किंगी यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे, कारण याचिकाकर्त्याचे वकिल हे सिद्ध करण्यास सक्षम नव्हते की जेणेकरून चित्रपटात संजय दत्तला अभिनय करण्यास बंदी घातली जाईल. संजय दत्तचे शूटिंग जवळजवळ तीन दिवस बाकी आहे आणि निर्माता कार्तिक गौडा म्हणाले की, तीन महिन्यांनंतर बरे होऊन परत आल्यावर मी त्यांच्याबरोबर काम करणार आहे.

संजय दत्तदेखील बर्‍याच काळापासून सिक्वेलवर काम करत आहे आणि असं मानलं जात आहे की यामुळे संजय दत्तच्या कारकीर्दीला नवी उड्डाण मिळेल. संजय दत्तचा मनमोहक लूकही रिलीज करण्यात आला असून, यात संजय दत्त खुप खतरनाक दिसत आहे. संजय दत्तच्या या लूकची जोरदार प्रशंसा केली जात आहे आणि त्याचे चाहते चित्रपटाची अतुरतेने वाट पाहत आहेत.