कर्करोगाच्या उपचारादरम्यान संजय दत्त अचानक पत्नीसह दुबईला रवाना

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याचे कुटुंब अत्यंत कठीण काळातून जात आहे. संजय दत्त हे सध्या फुफ्फुसांच्या कर्करोगाशी झगडत आहेत. गेल्या महिन्यात संजय दत्त यांना फुफ्फुसांचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. त्यानंतरच त्यांना मुंबई येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजय दत्त या आजाराशी जोरदार सामना करत आहे. अलीकडेच संजय दत्तने पहिले केमोथेरपी घेतली. आता बातमी येत आहे की तो पत्नी मान्यता बरोबर दुबईला पोहोचला आहे.

ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार,१५ सप्टेंबर रोजी संजय दत्त दुबईला रवाना झाला. तो दुबईमध्ये एकटाच नसून त्यांच्यासोबत पत्नी मान्यता दत्त देखील आहे. मंगळवारी संध्याकाळी चार वाजता संजय दत्त चार्टर्ड विमानाने पत्नी व दोन मुले शहारन व इकरा यांना भेटण्यासाठी दुबई येथे गेले आहेत.त्यांची दोन्ही मुले सध्या दुबईत आहेत.बातमीनुसार संजय दत्तला आपल्या दोन मुलांना भेटण्याची खूप इच्छा होती. याच कारणास्तव तो त्यांना भेटण्यासाठी दुबईला पोहोचला.असं ऐकायला येत आहे कि तो दहा दिवसांत मुंबईला परत येऊ शकतो.

संजय दत्तची पत्नी मान्यताने नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इम्तिहान या चित्रपटाच्या ‘रुक जाना नहीं तुम कहूं हर के’ या गाण्याच्या काही ओळी लिहिल्या आहेत.मान्यताने लिहिले आहे,की “थांबू नका,आपण कुठेही हरु नका…काट्यावर चालत जा आणि सावल्यांमधून बाहेर पडा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस परत आणण्यासाठी आम्हाला वाईट दिवस झगडावे लागतील.” कधीही हार मानू नका.  यासह, मान्यताने अनेक हॅशटॅग देखील वापरले आहेत.जसे की #inspiration #courage #strength #love #grace #positivity #dutts #challenging Yet #beautifullife #thankyougod।

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like