‘KGF 2’ च्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल संजय दत्त म्हणाला – ‘हा तर फक्त टीझर आहे, पिक्चर अभी बाकी है !’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   काही दिवसांपूर्वीच KGF-2 चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून केजीएफच्या दुसऱ्या पार्टची आतुरतेने वाट बघत होते. जेव्हा यश म्हणाला होता की, केजीएफ -2 पहिल्या भागापेक्षाही मोठ्या स्तरावर पोहोचेल आणि त्यापेक्षा हा मोठा चित्रपट असेल, तेव्हा लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. यशने आपला विश्वास कायम ठेवला आहे. यशच्या वाढदिवसा दिवशी म्हणजेच 8 जानेवारीला KGF -2 चा टीझर रिलीज करण्यात आला होता. टीझर रिलीज होताच चाहत्यांना टीझरबद्दल वेड लागले. आतापर्यंत हे टीझर 13 कोटीहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि ते यूट्यूबवर दुसर्‍या क्रमांकावर ट्रेंड होत आहे.

यशशिवाय संजय दत्तही (Sanjay Dutt) या चित्रपटात ज्येष्ठ खलनायक अधीराची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादामुळे तो खूप खूष आहे. टीझरबद्दल तो म्हणाला – “हा तर फक्त टीझर होता, चित्रपट अजून बाकी आहे, लोकांना ते लवकरात लवकर पाहायला मिळावे, अशी माझी इच्छा आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.” संजय दत्तने चित्रपटाची ऑफर मिळाली तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी होती याबाबत सांगितले. तो म्हणाले- “बर्‍याच दिवसानंतर मला अशी भूमिका मिळाली. या भूमिकेविषयी ऐकून मला खूप आनंद झाला. हे पात्र खूप शक्तिशाली होते आणि मी त्वरित ही भूमिका करण्यास हो म्हणालो.”

रवीना टंडन देखील या चित्रपटाचा मुख्य भाग आहे. ती म्ह्णणाली, चित्रपटाबद्दल मला फार काही सांगायचं नाही पण एक वेगळी आणि रंजक व्यक्तिरेखा आहे. रमिका सेन नावाची व्यक्तिरेखा एक अतिशय गुंतागुंतीची आणि शक्तिशाली व्यक्तिरेखा आहे. तुम्ही माझ्या भूमिकेचा अंदाजदेखील लावू शकत नाही.