‘ओ साकी साकी’च्या रीमेकवर संजय दत्तने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमचा चित्रपट ‘बाटला हाउस’ मधील ‘ओ साकी साकी’ प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रदर्शित होताच सगळ्यांच्या तोंडात हेच गाणे ऐकायला मिळत आहे. नेहा कक्करच्या आवाज आणि नोरा फतेहीच्या डान्सचा जलवा चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कोएना मित्राला या गाण्याचे न्यू वर्जन आवडले नाही. पण संजय दत्तला हे गाणे खूप आवडले आहे.

नुकताच संजय दत्तचा अपकमिंग मराठी चित्रपट ‘बाबा’चे प्रमोशन करण्यासाठी पोहचला होता. तिथे त्याला गाण्याच्या रिमेकवर काही प्रश्न विचारले गेले. तेव्हा संजयने सांगितले की, हे गाणे खूप चांगले आहे. गाण्याचा रिमेक पाहून असे वाटते. आजही हे गाणे प्रसिद्ध आहे. हे गाणे २००४ मध्ये प्रदर्शित झाले होते. हे गाणे संजय दत्त, अनिल कपूर, समीरा रेड्डीचा चित्रपट ‘मुसाफिर’चा रिमेक आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री कोएना मित्राने जबरदस्त डान्स केला होता. सुनिधि चौहान आणि सुखविंदर यांनी या गाण्याला आवाज दिला होता.

गाण्याचा टीजर प्रदर्शित झाल्यानंतर कोएनाने ट्विटद्वारे आपली नाराजगी व्यक्त केली होती. या अभिनेत्रीने ट्विट केले की, ‘मुसाफिर’चित्रपटातील माझ्या गाण्याला रिक्रिएच केले जात आहे. सुनिधी-सुखविंदरचा आवाज, विशाल शेखरचे म्यूजिक या गाण्यामध्ये खूपच चांगले होते. पण मला या गाण्याचे न्यू वर्जन अजिबात आवडले नाही. या गाण्याने ब्लॉकबस्टर रेकॉर्ड तोडले होते. ‘बाटला हाउस’ मध्ये का हे गाणे घेतले ?

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like