PM मोदी नंतर आता बालाकोट एयर स्ट्राइकवर सिनेमा बनवणार संजय लीला भन्साळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मन बैरागी नावाचा सिनेमा प्रोड्युस करणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता फेब्रुवारीमध्ये झालेल्या बालाकोट एअरस्ट्राईकवर सिनेमा बनवणार आहेत. भन्साळी आणि टी सीरीजचे मालक भूषण कुमार मिळून हा सिनेमा प्रोड्युस करणार आहेत. या सिनेमाचं डायरेक्शन केदारनाथ, काई पो छे आणि रॉक ऑन यांसारखे सिनेमे बनवणारे डायरेक्टर अभिषेक कपूर करणार आहेत.

संजय लीला भन्साळी यांच्या प्रॉडक्शन हाऊसनं ट्विटवरून याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “संजय लीला भन्साळी, भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर मिळून भारताच्या पुत्रांना समर्पित करत त्यांचं शौर्य दाखवण्यासाठी 2019 च्या बालाकोटवर आधारीत एक सिनेमा बनवणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अभिषेक कपूर हे या सिनेमांच दिग्दर्शन करणार आहेत.”

सिनेमाची कास्टींग आणि इतर माहिती येणं अद्याप बाकी आहे. भन्साळींच्या आधी अभिनेता विवेक ओबेरॉयनंही फेब्रुवारी 2019 मधील बालाकोट स्ट्राईकवर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतानं 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील दहशतवादी ठिकणांना निशाणा करत एअर स्ट्राईक केला होता.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like