Video : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीवर फिदा झाले लोक ! वारंवार पाहिला जातोय ‘हा’ व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अभिनेत्री, सिंगर, एक्स बिग बॉस (Bigg Boss) स्पर्धक आणि स्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा आपल्या ठुमक्यांनी आग लावत असते. सपना जेवढी फेमस लोकांमध्ये असते तेवढीच ती सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टीव असते. सपनाचा एक डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. सपनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सपना यात चटक मटक या हरियाणवी गाण्यावर डान्स करत आहे.

सपना चौधरीचा एक डान्स व्हिडीओ सध्या युट्युबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. यात हरियाणवी गाण्यावर सपना जोरदार ठुमके लगावताना दिसत आहे. सपनाचा हा डान्स एवढा व्हायरल झाला आहे की, याला अद्याप कोट्यावधी लोकांनी पाहिलं असून अजूनही लोक वारंवार हा व्हिडीओ पहात आहेत. सपनाची फॅन फॉलोविंग एवढी मोठी आहे की, तिची गाणी रिलीज होताच हिट होत असतात.

लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं निळ्या रंगाचा सुट घातला आहे. या डान्सची खास बात अशी की, हा तिच्या कोणत्या शोमधील डान्स नाही तर, तिच्या घरातच सपना डान्स करत आहे.

सपनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांची तिच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

सपनाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 4 ऑक्टोबर 2020 रोजी सपनाननं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सपनानं जानेवारी 2020 मध्ये बॉयफ्रेंड वीर साहू (Veer Sahu) सोबत एका मंदिरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत सिक्रेट मॅरेज केलं होतं. बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या लग्नाची बातमी आणि फोटो समोर आले होते. 4 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केलं. वीर साहू सिंगर, कंपोजर लिरीसिस्ट, अ‍ॅक्टर आहे. त्याला हरियाणाचा बब्बू मान म्हटलं जातं.

सपनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर डान्सर सपना चौधरीनं दोस्ती के साईड इफेक्ट्स मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सपना बिग बॉस 11 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही झळकली आहे. यानंतर तिला भोजपुरी सिनेमात काम मिळालं होतं. बैरी कंगना हे तिचं स्पेशल नंबर खूप गाजलं. यानंतर तिनं पंजाबी सिनेमात स्पेशल साँग केलं आहे. आता लवकरच ती लोरी सिनेमात काम करताना दिसणार आहे. सपनाला भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ याच्या सोबत एका सिनेमात प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.