#VideoViral : सपना चौधरीने धरला असा ठेका ; वधूलाही आवरला नाही थिरकण्याचा मोह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या डान्सच्या ठुमक्यांनी अनेकांना थिरकायला लावणाऱ्या डान्स सपना चौधरीचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण तिचे दीवाने आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सपना चौधरी केवळ डान्सर नाही तर ती हरियाणवी सिंगर देखील आहे. तिने डान्स केलेले गाणे जरी कुठे लावले तरी पाय थिरकायला लागतात आणि तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नुकताच तिचा कोलकाता येथील व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BwWneV6A2XI/?utm_source=ig_embed

कोलकात्यामधील एका लग्नात नुकतीच सपना चौधरी सहभागी झाली होती. तिथे तिने नवऱ्या मुलीसोबत डान्स केला आणि तिचा हा व्हिडीओ सध्या वाऱ्यासारखा सोशलवर पसरत आहे. हट जा ताऊ या गाण्यावर तिने ठेका धरल्याचे दिसत आहे.

सपना चौधरीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॅन पेजवरून हा तिचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ लगेचच सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत वधू देखील तिच्या सारख्या स्टेप्स करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

बिग बॉस 11 नंतर सपना चौधरीची लोकप्रियता खूपच वाढली. यानंतर ती घराघरात पोहोचली. तेरी आख्या का यो काजल तिच्या गाण्याला युट्युबवर तब्बल 400 मिलियन व्ह्युज आहेत. लवकरच ती एका हरयाणवी वेब सिरीजमध्येही झळकणार आहे. चाची राम राम असं या वेब सिरीजचं नाव आहे.