पार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल झाले जुने फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूडची बरीच मोठी नावे समोर येत आहेत. रिया चक्रवर्तीने अभिनेत्री सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत अनेकांच्या नावांची कबुली नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडे दिली आहे. एनसीबी लवकरच साराला समन्स पाठवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सारा अली खानचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती मित्रांसह पार्टी करताना दिसत आहे.

सारा अली खानला पार्ट्या खूप आवडतात. तिला बर्‍याचदा रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांमध्ये स्पॉट केले जाते. एका चित्रात सारा अली खान हातात ड्रिंक घेताना दिसत आहे. तिच्यासोबत बरेच मित्र आहेत. हे फोटोज अमिताभ बच्चन यांची नातं नवी नवेली नंदाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील आहेत. 2017 मध्ये सारा अली खानची ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यामध्ये ती माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहाडिया यांच्याबरोबर पार्टी करताना दिसली. सारा आणि वीर यांच्यातील जवळीक पाहून असे म्हंटले जात होते की, ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, त्यापैकी दोघांनीही याची पुष्टी केली नाही.

या अहवालानुसार रिया चक्रवर्तीने सांगितले की, सारा अली खान आणि सुशांतसिंह राजपूत ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांचे सेवन करत असत. हिमालयच्या जवळच या चित्रपटाचे चित्रीकरण केले जात आहे तेथून ड्रग्सचा पुरवठा सुरळीत होता. सारा आणि सुशांतचे वजनही त्या दिवसांत ड्रग्समुळे वाढले होते.

सारा अली खानचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये ती धूम्रपान करताना दिसत होती. व्हिडिओमध्ये सारा अली खानसोबत सुशांत सिंग राजपूत होता. दोघेही सुशांतच्या फार्महाऊसमध्ये एन्जॉय करत होते. यादरम्यान सारा आणि सुशांत बाल्कनीमध्ये धूम्रपान करताना दिसले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like