गणपतीची पूजा करताना ‘ट्रोल’ झाली सारा ! लोकांनी केले ‘अश्लील’ कमेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतेच गणपतीचे देशभरात आगमन झाले आहे. देशभरात लोक खूप उत्साहाने गणेश चतुर्थी साजरी करत आहे. मग ते सामान्य लोक असो किंवा मग बॉलिवूड कलाकार सर्व गणपती बाप्पांच्या भक्तीत मग्न आहेत. काहीजणांनी गणपती विराजमान करताना तर काही त्यांना प्रार्थना करताना तर काहींनी गणपती विसर्जन करतानाचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्यातील एक बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सारा अली खान.

गणेश चतुर्थीनिमित्त तिने देखील गणपतीचा फोटो पाहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये साराने रेड कलरचा कुर्ता आणि क्रीम कलरची लेगिंग्स घातली आहेत. सारा अगदी साध्या लूकमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करताना साराने गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत परंतु, काही युजर्सने साराला चांगलेच ट्रोल केले आहे. युजर्सने तिच्या फोटोवर अश्‍लील कमेंट केल्या आहेत. कमेंटमध्ये लिहले आहे की, सारा मुस्लिम आहेत, तिने गणपतीची पूजा करू नये.

साराने फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहले की, ‘गणपती बाप्पा मोरया! मला आशा आहे की, गणेश तुमच्या सर्व समस्या दूर करेल आणि तुमचे आयुष्य आनंदाने, सकारात्मकतेने आणि यशस्वीतेने भरेल. पण साराच्या या फोटोला कोणी हिंदू म्हणले तर कोणी म्हणाले की, तु हिंदूच बनली पाहिजे, एका युजरने कमेंट केली की, तु असे करून मुस्लिमांची बदनामी करत आहे, एका युजरने कौतुकास्पद कमेंट केली की, ती प्रत्येक उत्सव साजरा करते ही चांगली गोष्ट आहे.’

साराबद्दल बोलायचे म्हणले तर ती कार्तिक आर्यनबरोबरच्या मैत्रीबद्दल चर्चेत आहे. दोघेही बर्‍याचदा एकत्र स्पॉट होतात. सध्या दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, पण या दोघांनी अद्यापही आपल्या नात्याबद्दल काही खुलासा केला नाही.

आरोग्यविषयक वृत्त –