सरोज खानच्या निधनानं बॉलिवूडमध्ये पुन्हा ‘शोककळा’, ‘अमिताभ’, ‘अक्षय’, ‘रेमो’सह अनेक सेलेब्सनं व्यक्त केलं दु:ख !

प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खाननं जगाचा निरोप घेतला आहे. कार्डियक अरेस्टमुळं मुंबईत त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण झाल्यानं त्यांना बांद्र्यातील गुरू नानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज (शुक्रवार दि 3 जुलै 2020) त्यांना मालाड येथील कब्रिस्तानात सुपुर्द-ए-खाक करण्यात आलं. त्यांना अखेरचा निरोप देण्याासाठी त्यांचे काही कुटुंबीय आणि जवळचे नतेवाईक उपस्थित होते. त्या 71 वर्षांच्या होत्या.

सरोज खान यांच्या निधनानंतर बॉलिवूड आता पुन्हा एकदा शोकमध्ये आहे. अनेक सेलेब्ससोबत चाहत्यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.

बिग बी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रेमो डिसूजा, फराह खान, निमरत कौर, मनीषा कोईराला अशा अनेकांनी ट्विट करत सरोज खानच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

71 वर्षीय सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. 50च्या दशकात त्यांनी अनेक बॉलिवूड सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. आपल्या 4 दशकाच्या करिअरमध्ये त्यांनी 2000 हून अधिक गाणी कोरियोग्राफ केली आहेत. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच त्यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली होती. 1974 साली आलेल्या गीता मेरा नाम या गाण्यानं त्यांना कोरियोग्राफर म्हणून फिल्म इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला होता.