सरोज खानच्या निधनानं आतून पूर्णपणे तुटलीये माधुरी दीक्षित ! Tweet करत म्हणते…

प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खाननं जगाचा निरोप घेतला आहे. कार्डियक अरेस्टमुळं मुंबईत त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण झाल्यानं त्यांना बांद्र्यातील गुरू नानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज (शुक्रवार दि 3 जुलै 2020) त्यांना मालाड येथील कब्रिस्तानात सुपुर्द-ए-खाक करण्यात आलं. त्यांना अखेरचा निरोप देण्याासाठी त्यांचे काही कुटुंबीय आणि जवळचे नतेवाईक उपस्थित होते. त्या 71 वर्षांच्या होत्या.

माधुरी दीक्षितची अनेक हिट गाणी सरोज खाननं कोरियोग्राफ केली आहेत. धक धक करेन लगा पासून तर तबाह हो गए पर्यंत माधुरीची अनेक हिट गाणी अशी आहेत ज्यासाठी सरोज खानला लक्षात ठेवलं जाईल. माधुरी आणि सरोज खान यांची खूप चांगली बाँडिंग होती. त्यांच्या निधनानं माधुरीला धक्का बसला आहे. ट्विट करत तिनं आपल्या भावना मांडल्या आहेत. माधुरी आतून तुटली आहे.

माधुरीनं शेअर केलेल्या ट्विटमध्ये ती म्हणते, “मी माझा गुरू आणि एक दोस्त सरोज खानला गमावल्यानं आतून पूर्णपणे तुटली आहे. मी त्यांच्या कामासाठी कायमच त्यांची आभारी राहिल ज्यामुळं मी डान्समध्ये अनेक शिखरं गाठू शकले आहे. जगानं अद्भूत अशा प्रतिभावान व्यक्तीला गमावलं आहे. मी कायम तुम्हाला मिस करेन.”

सरोज खान यांनी श्रीदेवी, माधुरी दीक्षित, आलिया भटसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसाठी कोरियोग्राफी केली आहे. आपल्या डान्स आणि एक्सप्रेशननं माधुरी दीक्षितनं इंडस्ट्रीत तिचं जे काही स्थान तयार केलं आहे यामागे सरोज खानचा खूप मोठा रोल आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like