सुशांत सिंह राजपूतसाठी होती सरोज खानची अखेरची पोस्ट ! इमोशनल होत म्हणाल्या होत्या…

रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खाननं जगाचा निरोप घेतला आहे. कार्डियक अरेस्टमुळं मुंबईत त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण झाल्यानं त्यांना बांद्र्यातील गुरू नानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज (शुक्रवार दि 3 जुलै 2020) त्यांना मालाड येथील कब्रिस्तानात सुपुर्द-ए-खाक करण्यात आलं. त्यांना अखेरचा निरोप देण्याासाठी त्यांचे काही कुटुंबीय आणि जवळचे नतेवाईक उपस्थित होते. त्या 71 वर्षांच्या होत्या. सध्या सरोज खान यांच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टची सोशलवर चर्चा सुरू आहे.

सरोज खान यांची शेवटची इंस्टा पोस्ट ही सुशांत सिंह राजपूतसाठी होती. सुशांतच्या निधनानंतर त्यांनी एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती. सुशांतचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं की, “मला कधी सुशांतसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही. परंतु मी त्याला खूपदा भेटले होते. विचार करत आहे की, सुशांतनं असं पाऊल का टाकलं ? सुशांत जे पाऊल टाकलं आहे त्यानं त्याचे वडिल आणि बहिणींवर काय परिणाम होईल ?”

https://www.instagram.com/p/CBazhptBaWV/?utm_source=ig_embed

सरोज यांनी पुढं लिहिलं की, “सुशातं तू एखाद्या मोठ्या व्यक्तीसोबत बोलू शकत होता, जे तुझी मदत करू शकले असते. आणि तुला जगताना पाहून आम्हीही आनंदी राहू शकलो असतो.

सरोज खान लिहितात, “देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. तुझे वडिल आणि बहिणींना यातून सावरण्यासाठी देव खूप सारी शक्ती देवो. मला तुझे सगळे सिनेमे आवडले आहेत. कायमच तुझ्यावर प्रेम करत राहिल. R.I.P”

सरोज यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक सुपरडुपरहिट सिनेमांसाठी कोरियोग्राफी केली आहे. यात मिस्टर इंडिया, चांदनी, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेस, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी वेट, एजेंट विनोद, राऊडी राठोड, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका असे अनेक सिनेमे सांगता येतील. 50च्या दशकात त्यांनी अनेक बॉलिवूड सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच त्यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली होती. आपल्या 4 दशकाच्या करिअरमध्ये त्यांनी 2000 हून अधिक गाणी कोरियोग्राफ केली आहेत