माधुरी, काजोलसह बॉलिवूडमधील ‘या’ 6 ‘सुपर मॉम्स’नं प्रेग्नंसीच्या काळातही केलं शुटींग

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडमध्ये फिटनेसला खूप महत्त्व आहे. अशात अनेक अभिनेत्री अशा असतात ज्या लग्नानंतर किंवा मुलं झाल्यानंतर आपल्या करिअरला गुड बाय करतात. परंतु अशाही काही ॲक्ट्रेस आहेत ज्यांनी लग्नानंतरही आणि प्रेग्नंसीच्या काळातही आपल्या करिअरला कधी गुडबाय म्हटलं नाहीआ आणि शुटींगही पूर्ण केली. अशाच काही ॲक्ट्रेस बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) जया बच्चन – सुपर डुपर हिट सिनेमा शोलेच्या आधीच जया बच्चन आणि महानायक अमिताभ बच्चन यांचं लग्न झालं होतं. या सिनेमाच्या शुटींगदरम्यान जया तीन महिन्यांची प्रेग्नंट होती. या सिनेमानंतर तिनं मुलगी श्वेताला जन्म दिला.

View this post on Instagram

A post shared by Jaya Bachchan (@bachchanjaya) on

2) हेमा मालिनी – अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक, नृत्यांगाना ते नेता बनलेल्या हेमा मालिनी यांनीही प्रेग्नंसीच्या काळात शुटींग केली आहे. पहिल्यांदा आई होतानाही त्यांनी कडक उन्हातही उंटाची सवारी केली आहे. रजिया सुल्तान सिनेमादरम्यान त्या पहिल्यांदा आपल्या मुलाला जन्म देणार होत्या.

View this post on Instagram

Красавица

A post shared by Хема Малини (@malinikhema) on

3) श्रीदेवी – 1997 साली आलेल्या जुदाई सिनेमादरम्यान श्रीदेवी प्रेग्नंट होती. याच वर्षी तिनं जान्हवीला जन्म दिला. 1996 साली तिनं बोनी कपूरसोबत लग्न केलं होतं. तिनं प्रेग्नंसीला कधीच शुटींगच्या आड येऊ दिलं नाही.

View this post on Instagram

SrideviJi in her last and Blockbuster film Judaai before comeback. The superstar mother SrideviJi who sacrifice her no.1 position as an actress only for her daughters after blockbuster Juddai, She made a blockbuster comeback after 15 with English Vinglish(record of only actress whose comeback is blockbuster) . . . . . #sridevi #sridevikapoor #priyankachopra #deepikapadukone #katrinakaif #shraddhakapoor #aliabhatt #janhvikapoor #saraalikhan #srk #salmankhan #amitabhbachchan #anilkapoor #madhuridixit #rekha #dishapatani #vickykaushal #ananyapandey #anushkasharma #kartikaaryan #varundhawan #ranbirkapoor #ranveersingh #khushikapoor #aishwaryarai #kareenakapoor #kajol #akshaykumar #ajaydevgan #judaai

A post shared by Sridevi Kapoor (@srideviworld) on

4) जुही चावला – 1984 ची मिस इंडिया राहिलेली बॉलिवूड ॲक्ट्रेस जुही चावलानं 1995 मध्ये बिजनेसमन विजय मेहता सोबत लग्न केलं. तिनं दोन मुलांना जन्म दिला. लग्नानंतरही तिनं सिनेमाशी नातं तोडलं नाही. आमदानी अठन्नी खरचा रुपैया या सिनेमादरम्यान तिला आपल्या प्रेग्नंसीदरम्यान समजलं. तरीही तिनं शुटींग पूर्ण केली. दुसऱ्या मुलाला जन्म देतानाही ती 7 महिन्यांची प्रेग्नंट होती. तरीही तिनं झंकार बीट्सची शुटींग पूर्ण केली.

View this post on Instagram

⚡️

A post shared by Juhi Chawla (@juhichawla_fanclub) on

View this post on Instagram

💕

A post shared by Juhi Chawla (@juhichawla_fanclub) on

5) माधुरी दीक्षित – 90 दशकात माधुरीनं अनेक हिट सिनेमे दिले. 1999 साली तिनं डॉ. श्रीराम नेने सोबत लग्न केलं. देवदास सिनेमादरम्यान ती प्रेग्नंट होती. या सिनेमात तिनं जबरदस्त डान्सही केला आहे. यानंतर तिनं काही काळ ब्रेक घेतला होता.

6) काजोल – वी आर फॅमिली या सिनेमादरम्यान काजोल प्रेग्नंट होती. यावेळी ती दुसऱ्यांदा आई होणार होती. प्रेग्नंट असूनही तिनं सिनेमाची शुटींगही पूर्ण केली आणि प्रमोशनही केलं.

याशिवाय बॉलिवूडमध्ये अशा अनेक सुंदर अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रेग्नंसीदरम्यानही कामावर परिणाम होऊ दिला नाही. यात करीना कपूर, कल्की कोचलिन, नेहा धुपिया अशी काही नावं सांगता येतील.