‘त्या’ कारणावरून अभिनेता सौरभ शुक्ला आणि ‘दबंग 3’च्या रायटरमध्ये जोरदार ‘भांडण’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सौरभ शुक्ला म्हणजेच सत्या सिनेमातील कल्लू मामा यांना एका सिनेमाच्या सेटवर रायटरवर चांगलेच भडकले. त्यांनी सेटवर खूप गोंधळ घातला. सिनेमाच्या रायटरलाच खूप बडबड केली. एवढेच नाही तर त्यांनी रायटरला शिवीगाळही केली. हे सगळं हायव्होल्टेज ड्रामा असणाऱ्या एका आगामी सिनेमाच्या सेटवर झालं. सौरभ यांचा हा वाद सलमान खानच्या दबंग सिनेमाची स्टोरी लिहिणाऱ्या रायटर दिलीप शुक्ला सोबत झाला होता. त्यांनी दबंग 3 ची स्टोरी लिहिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सर्व चूक केवळ सौरभ शुक्ला यांची नव्हती. दिलीप शुक्लानेही असे काही केले होते की, सौरभ यांना राग अनावर झाला आणि त्यांनी दिलीप यांना चांगलेच झापले.

सध्या जिमी शेरगली आणि माही गिल स्टारर फॅमिली ऑफ ठाकुरगंज या सिनेमाची शुटींग सुरु आहे. या सिनेमाची स्टोरी घायल, दामिनी, उडान आणि दबंग यांसारखे सिनेमे लिहिणाऱ्या रायटर दिलीप शुक्लाने लिहिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दिलीप अभिनेता सौरभ शुक्ला यांना अ‍ॅक्टींग करत सिनेमाचा डायलॉग कसा घ्यायचा हे शिकवत होते. सौरभ यांनी स्टोरी समजून घेत आपल्या पद्धतीने डायलॉग डिलीवर करत होते. परंतु दिलीप यांनी सौरभ सोबत दबंगाई करण्यास सुरुवात केली. 4 दशकांपासून सिनेमात काम करणाऱ्या सौरभ शुक्ला यांना दिलीप यांची ही जबरदस्ती आवडली नाही त्यांना दिलीप यांचा राग आला. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. असे सांगितले जात आहे की, सौरभ शुक्ला यांनी दिलीप यांना शिवीगाळ केली.

या वादानंतर सौरभ शुक्ला यांनी 5 तास स्वत:ला व्हॅनिटी व्हॅनमध्ये बंद केले. त्यांनी अशा वातावरणात काम करण्यास साफ नकार दिला. सेटवर उपस्थित एका सीनीयर प्रोड्युसरने त्यांच्याशी संवाद साधले नंतर सौरभ यांनी त्यांच ऐकलं आणि त्यांनी शुटींग पूर्ण केली.

मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, या सिनेमाच्या सेटवर प्रत्येकजण दिलीप यांच्या दादागिरी आणि मनमानीमुळे त्रस्त आहे. ते लोकंना खूपच वाईट वागणूक देतात. असे सांगितले जात आहे की, काही लोकांसोबत तर कधी ते हाणामारीवरही येतात. सौरभ शुक्ला यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. निर्मात्यांनी या वादाचे कारण क्रिएटीव डिफरंस असल्याचे सांगितले.

सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर, फॅमिली ऑफ ठाकुरगंज 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मनोज झा हे या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात जिमी शेरगिल, माही गिल, सौरभ शुक्ला, नंदिश संधू, सुप्रिया पिळगावकर, प्रणति राय, मनोज पाहवा आणि पवन मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.