‘किंग’ खानचा मोठा खुलासा ! ‘मन्नत’मध्ये रूम भाड्यानं हवी असेल तर द्यावी लागेल ‘मोठी’ किंमत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खान आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी ट्विटरवर #AskSRK हा हॅशटॅग वापरत असतो. आजही त्यानं हा हॅशटॅग वापरला. जेव्हा हा हॅशटॅग ट्रेंड झाला तेव्हा अनेकांनी त्याला प्रश्न विचारले. त्यानंही प्रयत्न केला की, जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं दिली जावीत जेणेकरून चाहते निराश होणार नाही.

कधी कधी चाहते शाहरुखला विचित्र प्रश्न विचारत असतात. तेव्हा शाहरुख त्यांना शानदार उत्तरं देत असतो. पुन्हा एकदा असंच काहीतरी झालं आहे ज्यावरून असं सिद्ध होतं की, तो बॉलिवूडचा किंग आहे. चाहत्यानं शाहरुखला असा प्रश्न विचारला ज्याची त्यालाही अपेक्षा नसते. परंतु शाहरुख ज्या पद्धतीनं त्याला उत्तर दिलं आहे त्यामुळे त्याची चांगली चर्चा होताना दिसत आहे.

एका चाहत्यानं शाहरुखला विचारलं, “सर मन्नतमध्ये रूम भाड्यानं हवी आहे. कितीला पडेल?” याला उत्तर देताना शाहरुख म्हणतो, “30 वर्षांच्या मेहनतीला पडेल.” हा प्रश्न आणि किंग खाननं दिलेलं उत्तर सर्वच चाहत्यांना आवडलं आहे. त्यानं दिलेल्या उत्तरानं त्यानं पुन्हा एकदा चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

यानंतर अभिनेता रितेश देशमुख यानंही त्याला गमतीनं एक प्रश्न विचारला. यावरही शाहरुखनं इंट्रेस्टींग उत्तर दिलं. रितेश म्हणाला, “अबरामकडून तो कोणता आयुष्याचा धडा शिकला आहेस?” यावर शाहरुख म्हणतो, “जेव्हा तुम्ही व्हिडीओ गेम खेळत असता आणि जेव्हा तुम्हाला राग येतो किंवा तुम्ही दु:खी आहात किंवा तुम्हाला भूक लागली असेल तर फक्त रडायचं.” याशिवाय इतरही अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना त्यानं उत्तरं दिली.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !