सिनेमात काम न मिळत नसल्यानं शाहरूख खानच्या अभिनेत्रीचे ‘हाल’, करावं लागतं ‘हे’ काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- अभिनेता शाहरुख खानची ‘परदेस’ चित्रपटातील अभिनेत्री महिमा चौधरी हीचा आज वाढदिवस आहे. महिमा आज 46 वर्षांची झाली आहे आणि चित्रपटाच्या पडद्यापासून पूर्णपणे गायब झाली आहे. महिमा शेवटी 2016 मध्ये बंगाली चित्रपट ‘डार्क चॉकलेट’ मध्ये दिसली होती. हा चित्रपट शीना बोरा हत्येप्रकरणी आधारित होता. काम नसल्यामुळे महिमाची आर्थिक परिस्थिती बरीच खालावली होती, ज्याचा उल्लेख तिने एका मुलाखतीतही केला होता.

2017 मध्ये एका मुलाखतीत महिमा म्हणाली की, ‘ भूमिका नसल्यामुळे तिला स्वत: ला इंडस्ट्रीपासून दूर ठेवावे लागले. उपजीविकेसाठी तिला कार्यक्रमामध्ये उद्घटनाला रिबन कट कराव्या लागल्या. महिमा म्हणाली होती की, “मी त्यावेळी अविवाहित होते आणि मला पैसे मिळवायचे होते. मुलाबरोबर चित्रपटात काम करणे कठीण आहे, परंतु यामध्ये बराच वेळ द्यावा लागतो मग मी काही टीव्ही कार्यक्रमांमध्ये, बऱ्याच फंक्शन्समध्ये मी प्रमुख म्हणून काम केले. मी रिबन कटिंग केले कारण ते माझ्यासाठी सोयीचे होते, याद्वारे मला लवकर आणि चांगले पैसे मिळू लागले. ”

मुलाखतीत महिमा पुढे म्हणाली, “आता मी मागे वळून पाहिले तर असे दिसते की त्या कामाने अभिनेत्री म्हणून माझे नुकसान केले आहे.” 2006 नंतर महिमाच्या ऑनस्क्रीन उपस्थितीत कमालीची घट झाली आहे. 1997 मध्ये ‘परदेस’ पासून अत्यंत यशस्वी पदार्पणानंतर महिमा ‘डाग-द फायर’, ‘प्यार कोई खेल नहीं’, ‘धडकन’, ‘दिवाना’, ‘ओम जय जगदीश’ आणि ‘दिल है तुम्हारा’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.

महिमाचे खरे नाव रितु चौधरी आहे, जे तिने चित्रपटांसाठी नाव बदलले. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी महिमा टीव्ही कमर्शियलमध्येही काम करत होती. आमिर खान आणि ऐश्वर्या राय यांच्याबरोबर असलेल्या कोल्ड्रिंकच्या जाहिरातीने तिला प्रसिद्धी दिली. महिमाने व्हीजे म्हणूनही काम केले.

महिमा टेनिसपटू लिअँडर पेस याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, परंतु रिया पिल्लईशी असलेल्या त्याच्या प्रेमसंबंधामुळे महिमा लिअँडरपासून दूरच राहिली. 2006 मध्ये तिने आर्किटेक्ट बिजनेसमॅन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. त्यांना एक 8 वर्षाची अरियाना नावाची मुलगी आहे. अलीकडेच असे समजले होते की, महिमा बिग बॉस 13 मध्ये सामील होऊ शकते, परंतु तिने ती संधी नाकारली.

आरोग्यविषयक वृत्त –