…म्हणून सध्या बादशाह शाहरुख खान ‘निवांत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने हिंदी चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. शाहरुख खानचा चित्रपट ‘जीरो’ बॉक्स ऑफीसवर फ्लॉप झाला होता. यानंतर त्याने एकही चित्रपट साईन केला नाही. अंतरिक्ष यात्री राकेश शर्मावर बनवला जाणारा ‘सारे जहां से अच्छा’या चित्रपटात काम करण्यास शाहरुखने आपले हात मागे घेतले आहे.

शाहरुख खानचा ‘जीरो’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर शाहरुख खूप निराश झाला आहे. त्यामुळे तो कोणताच चित्रपट साईन करत नाही. शाहरुखने चित्रपट साईन न करण्याचे कारण सांगितले आहे. शाहरुख म्हणाला की, ‘मी सध्या कोणत्याच चित्रपटात काम करत नाहीये. नेहमी असे होते जेव्हा मी एक चित्रपट पुर्ण केल्यानंतर लगेच दुसऱ्या चित्रपटाच्या कामाला सुरुवात करत असतो. यामुळे माझे तीन-चार महिने व्यस्त जातात. पण ‘जीरो’ चित्रपटात काम केल्यानंतर मला दुसऱ्या चित्रपटात काम करण्याची इच्छा नाही. मला वाटते की, मला थोडा वेळ घ्यावा लागेल. चित्रपट पहायला पाहिजे, कथा ऐकायला पाहिजे. त्याचबरोबर जास्तीतजास्त पुस्तके वाचली पाहिजे.’

शाहरुख पुढे म्हणाला की, ‘माझी मुलगी कॉलेजमध्ये जात आहे आणि मुलीचे शिक्षण पुर्ण होणाच्या मार्गावर आहे. यामुळे माझी अशी इच्छा आहे की, सध्या परिवाराला जास्त वेळ द्यावा.’ फादर्स डेच्या निमित्ताने शाहरुखने आपला मुलगा आर्यनसोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. सध्या शाहरुख खान मुंबईमध्ये ‘टेड टॉक्स’ च्या दूसऱ्या सीजनची शुटिंग करत आहे. याच दरम्यान असे समजले होते की, शाहरुख ‘धूम ४’ मध्ये चित्रपटात काम करणार आहे. अजूनही या चित्रपटाची घोषणा केली गेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय