शाहरुखच्या टीम मधील ‘हा’ खेळाडू लवकरच बॉलीवूडमध्ये करणार प्रवेश

वृत्तसंस्था – क्रिकेट आणि बॉलीवूडच खूप जुन नातं आहे, अनेक क्रिकेटर असे होऊन गेलेत कि त्यांनी खेळा सोबतच बॉलीवूड मध्ये सुद्धा काम केले. आणि आता परत एक क्रिकेटर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा क्रिकेटर कोणी दुसरा नसून तर इंडियन प्रीमियर लीगमधील शाहरुख खानच्या कोलकाता संघाचा सदस्य आहे. आंद्रे रसेलने इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केल आहे आणि तो म्हणाला की तो बॉलीवूड पदार्पण करणार आहे. संगीतकार पलाश मुछाल सोबत रसेलने एक फोटो टाकला आणि त्या फोटो सोबत एक कैप्शन टाकल आणि त्यात लिहिल की ‘पलाश साठी एक हिंदी गाणं रेकॉर्ड केलं हे माझे एकमेव बॉलीवूड पदार्पण आहे.

रसेल मैदानात सुद्धा चांगला खेळतो आणि त्याच खेळणं देखील शाहरुख खानला खूप आवडत. त्याने ट्विट केले होते की ‘रसेलने मला सांगितले होते की फान्सने त्याचे स्वागत केले हे पाहून त्यांना खूप आनंद झाला, त्याला पाहून तो रडला. मग तो म्हंटला कि सार्वजनिक ठिकाणी रडत नसता. कोलकाता टीम साठी नितीश राणा, रॉबिन उथप्पा आणि शुभमान गिल संपूर्ण टीम खेळते, तुझ्या प्रेमाबद्दल धन्यवाद. मॅच चालू असताना शाहरुख बऱ्याच वेळा मैदानात येत असतो आणि त्याचा टीमचा जलोष वाढवतो. वर्कफ्रंट ची गोष्ट केली तर शाहरुख ने अजून एकही चित्रपटावर स्वाक्षरी केली नाही. शाहरुख खानचा ‘झीरो’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तो त्याचा पुढचा चित्रपट करण्यासाठी खूप विचार करतो आहे.