Suhana Khan जेव्हा शाहरुख खानला भेटण्यासाठी आई गौरीसोबत पोहचली सेटवर, क्यूटनेस पाहून तुम्हालाही होईल प्रेम, Photo Viral

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खान(Shahrukh Khan) फिल्म इंडस्टीच्या टॉप स्टार्सच्या यादीत आहे. इतकेच नव्हे, शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खानची जोडी बॉलीवुडच्या परफेक्ट कपल्सपैकी एक आहे. दोघे नेहमी सोशल मीडियावर आपली रोमँटिक छायाचित्रे शेयर करत असतात. तर शाहरुख आणि गौरीच्या जोडीला फॅन्स खुप पसंत करतात. शाहरुख आणि गौरीच नव्हे, तर त्यांची लाडकी मुलगी सुहाना खान सुद्धा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नेहमी सुहानाची छायाचित्रे सोशल मीडियावर वायरल होत असतात. तसेच सुहानाचा फॅन फॉलोइंग सुद्धा खुप जबरदस्त आहे. सध्या शाहरुख खानचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. या छायाचित्रात तो आपली पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासोबत दिसत आहे.

शाहरुख खानचा वायरल होत असलेला थ्रोबॅक फोटो त्याचा सुपरहिट चित्रपट ’कभी खुशी कभी गम’च्या शुटिंगच्या दरम्यानचा आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुहाना त्यावेळी खुप छोटी होती. तर किंग खान आपल्या चिमुकल्या सुहानाला किस करताना दिसत आहे. तर, गौरी खान शेजारी चेयरवर बसलेली आहे. फोटोत वडील आणि मुलीमधील बॉडिंग स्पष्ट दिसून येते.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर तो सध्या आपला आगामी चित्रपट ’पठान’च्या शुटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सिद्धार्थ आनंद. चित्रपटातील त्याचा लुक सुद्धा समोर आला आहे, ज्यास मोठी पसंती मिळाली आहे. तर ’पठान’ मध्ये शाहरुख खानसह अ‍ॅक्टर जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण लीड रोलमध्ये दिसणार आहेत. मागच्यावेळी शाहरुख खान 2018 मध्ये रिलिज झालेल्या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने अनुष्का शर्मा आणि कॅटरीना कैफसोबत स्क्रीन शेयर केली होती.