‘A’ सर्टिफिकेट मिळालेल्या ‘या’ चित्रपटाने केली ‘२००’ कोटींची ‘कमाई’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुरानाने पहिल्या चित्रपटापासून चाहत्यांचे मन जिंकले होते. मागील काही वर्षात त्याने असे चित्रपट केले की, त्याचे नाव ऐकताच लोक त्याचा चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतात. सध्या ‘आर्टिकल-१५’ चित्रपटामध्येही काही असेच चालू आहे. आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाने मंगळवारी २ जुलैपर्यंत २७.६८ करोडोची कमाई केली आहे.

सविस्तर माहिती ही आहे की, ‘आर्टिकल-१५’ चित्रपट प्रदर्शित झाला त्यादिशी म्हणजेच २८ जूनला चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.०२ करोड, शनिवारी ७.२५ करोड, रविवारी ७.७७ करोड, सोमवारी ३.९७ करोड आणि मंगळवारी ३.६७ करोडोची कमाई केली. सगळे मिळून चित्रपटाने २७.६८ करोडोची कमाई केली आहे.

 

https://www.instagram.com/p/BzLUeh9AJpA/

चित्रपटामध्ये समाजात जातीबद्दल भेदभाव केले जाते हे दाखविले आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाचा हा ५ वा सुपरहिट चित्रपट आहे. कारण १८ ते २० करोडोमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पुर्ण पैसे वसुल केले आहे. त्याचबरोबर त्यांना फायदा देखील झाला आहे.

सध्या ‘आर्टिकल 15’ ला टक्कर देत आहे अभिनेता शाहिद कपूरचा चित्रपट ‘कबीर सिंह’. याबद्दल बोलायचे म्हणले तर या चित्रपटाने २ आठवड्यातच १९८.९५ करोडची कमाई केली होती. हा पहिला A सर्टिफिकेट प्राप्त करणारा हिंदी चित्रपट आहे. ज्याने २०० करोडोचा आकडा पार केला आहे.

या चित्रपटामध्ये अभिनेता शाहिद कपूरसोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची इतकी चर्चा झाली की, याचा फायदा कमाईच्या रुपात मिळत आहे. दोन आठवडे झाले तरी चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता कमी झालेली दिसत नाही.

 

सावधान ! तर मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका, ‘ही’ आहेत कारणे

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

मिठाच्या अधिक सेवनाने येऊ शकते आतड्यांवर सूज

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

शिरोळ तालुक्यातील पेयजल योजनेसाठी वंचित नेत्याकडून अनुदान