शाहिद कपूरची आई निलिमा अजीमनं अनेक वर्षांनंतर केलं पंकज कपूरसोबत घटस्फोटवर ‘भाष्य’, केले अनेक मोठे ‘खुलासे’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार शाहिद कपूरची आई आणि पंकज कपूरची पहिली पत्नी निलिमा अजीम याना वेगळं होऊन आता 36 वर्षे झाली आहेत. या 36 वर्षात निलिमानं दोन लग्न केली. निलिमानं तिच्या पहिल्या घटस्फोटोवर भाष्य करत अनेक मोठे खुलासे केले आहेत.

एका मुलाखतीत बोलताना निलिमा अजीम म्हणाली, “मला वेगळं नव्हतं व्हायचं. परंतु पंकज कपूर खूप पुढे गेले होते. मला हीच गोष्ट रुचत नव्हती. मी 15 वर्षांची होते तेव्हापासून आमची मैत्री होती. परंतु त्यांच्याकडे त्यांची कारणं होती. तीन वर्षांनी आम्ही वेगळं झालो.”

शाहिद बनला ताकद

निलिमा सांगते, “3 वर्षांच्या शाहिदला घेऊन वेगळं होणं हे खूप वेदनादायी होतं. मला या त्रासातून बाहेर यायला वेळ लागला. काही वर्षांनंतर मी यातून बाहेर पडले. शाहिदम मझी ताकद बनला होता. त्यानं मला खूप सपोर्ट केला आहे.”

घटस्फोटानंतर निलिमाची 2 लग्न

निलिमा आणि पंकज यांनी 1979 मध्ये लग्न केलं होतं. 1981 मध्ये शाहिदचा जन्म झाला. 1984 साली निलिमा आणि पंकज वेगळे झाले. यानंतर निलिमानं 1991 मध्ये राजेश खट्टरसोबत लग्न केलं. ईशान खट्टरच्या जन्मानंतर 2001 मध्ये दोघे वेगळे झाले. यानंतर निलिमानं 2004 मध्ये रजा अली खानसोबत लग्न केलं. हेही लग्न 2009 मध्ये तुटलं आणि दोघं वेगळे झाले.

1989 मध्ये पंकज कपूरनं केलं दुसरं लग्न

पंकज कपूरनं 1989 मध्ये अभिनेत्री सुप्रिया पाठकसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. मुलाचं नाव रूहान आणि मुलीचं नाव सना आहे. सना कपूर हिनं शानदार या सिनेमात काम केलं आहे.